Arni APMC Election : सहकारी संस्थेच्या जागा हडपणारेही उतरले बाजार समितीच्या निवडणुकीत !

Election : सत्तेसाठी घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Arni APMC
Arni APMCSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Arn APMC Election : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेक जण बाजार समितीचा विकास करण्याची आश्‍वासने देण्यात गुंतले आहेत. विविध राजकीय पक्षांनी आप-आपले हस्तक विविध माध्यमांतून मतदारांमध्ये घुसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. (An attempt has been made to infiltrate the voters)

काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी आपल्या सत्तेसाठी घोडे दामटण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांच्या बाजार समितीचा सर्वानाच विकास करायचा असल्याचे मतदारांना सांगितले जात आहे. तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्या माध्यमातून सोयी व सवलती द्यायच्या आहेत.

त्या कापसांच्या टोकनांची विक्री करून असो की नवीन शेड बांधकाम मधील भ्रष्टाचारावर तोंडसुख घेऊन हीच मंडळी पुन्हा आपल्या जातींचा आधार घेत निवडणुकीत उतरले आहेत, तर नैतिकतेच्या गप्पा मारणारेसुध्दा त्यांचे लांगूलचालन करीत आहेत. गोरगरिबांचा कष्टांचा पैसा बुडविणारेसुध्दा उजळमाथ्यांने या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. तर शेतकऱ्यांच्या संस्थेत व्यापाऱ्याचे कैवारी म्हणवून घेऊन नेते शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देत आहेत.

सहकारी संस्थेच्या जागा हडपणारेसुध्दा पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकीत उतरले आहेत. काही जण तर आप-आपल्या जातींचे गणित मांडूनच या निवडणुकीत उतरले आहेत. ५२५ मतदारांमधून संचालक निवडून येतात. मग माझ्या जातीचे एवढे, अन् त्याच्या जातीचे तेवढे, अशी गणिते मांडली जात आहेत. तर धनाढ्य नेते मते विकत घेण्याची चर्चा खुलेआम करताना दिसत आहेत.

Arni APMC
APMC Chandrapur : काय हे काय चाललंय? भाजप- कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षच आले एकत्र !

पैशातून सत्ता व सत्तेतून मलिदा, हाच एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही निवडणूक लढविली जात आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. राजकीय पुढारीच हा सर्व खेळ करीत आहेत. केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा कांगावा निर्माण करायचा. आणि आपले उखळ पांढरे करून घ्यायचे, हा एकमेव धंदा सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांना या बाजार समितीत आपला शेतमाल विक्री करताना कोणता त्रास होतो, ते कसे नागविले जातात, कशी अडत बंद असताना तीन टक्के अडत कापली जाते, संस्थेतील या अनागोंदी कारभारावर कोणीच बोलायला तयार नाही.

Arni APMC
APMC Balapur : २० वर्षांची सत्ता उलथून लावण्यासाठी वंचित-भाजप उतरले मैदानात?

येथे शेतकऱ्यांना (Farmers) पिण्याचे पाणी नाही, शेतमाल टाकण्यासाठी शेड उपलब्ध नाही., त्याकडे यांपैकी कोणालाच लक्ष द्यायला वेळ नाही. केवळ हिस्से वाटणीची सवय लागलेलेच निवडणुकीत (APMC Election) सक्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या संस्थेतून केवळ मलिदा लाटायचा, या दृष्टीनेच बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

सर्वच राजकीय (Political) पक्षांनी यात भागीदारी केली आहे. बाजार समितीचे दोन्ही ५० टनी वे ब्रीज काटे व्यापाऱ्यांना भाड्याने देणाऱ्यांना एखादा गरीब शेतकऱ्यांचा मुलगा दिसला नाही, हे वास्तव आहे. अशा नेत्यांना (Leaders) धडा शिकवून प्रत्यक्ष कार्य करणाऱ्याला संधी देण्यावर मतदारांचा यावेळी भर राहणार, असं दिसतंय.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com