Gondia Crime : लाखोंचे सोने, हिरे पाहून कारागिराची नियत फिरली की....

Police Investigation : 24.60 लाखांचा ऐवज शोधण्यासाठी पोलिसांची धावाधाव
Gold & Diamond Items.
Gold & Diamond Items.Sarkarnama
Published on
Updated on

Merchants In Tension : गोंदियातील सराफा व्यापाऱ्यांना कारागिरावर विश्वास ठेवण्याचा प्रकार चांगलाच नडला आहे. शहरातील 11 सराफा व्यापाऱ्यांचा माल दागिने तयार करण्यासाठी कारागीर घेऊन गेला. मात्र तो परतलाच नाही. तब्बल 24.60 लाखांचे सोने-हिरे घेऊन कारागीर पसार झाल्याने सराफा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोंदियात गेल्या 15 वर्षांपासून सोने आणि हिऱ्यांमध्ये खेळणाऱ्या या कारागिरासाठी चकाकणारे सोने, हिरे आणि रत्न ही नवीन बाब नाही. एक दशकात त्याने गोंदियातील सराफ्यांची कोट्यवधी रुपयांची कामे केली असतील. मग अचानक असे काय घडले, की या कारागिराला लाखो रुपयांचा हा ऐवज घेऊन फरार व्हावे लागले, या विचारांनी सराफा व्यापारी व पोलिसांच्या डोक्याचा भुगा झाला आहे.

Gold & Diamond Items.
Gondia Political : आमगाव, तिरोडा तालुक्याला उदासीनतेचे ग्रहण..! ग्रामस्वच्छता अभियानाची तपासणी रखडली...

राजू अशोक सामंता (वय 31) असे याप्रकरणातील आरोपी कारागिराचे नाव आहे. पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यातील जगतपूर येथील मूळ रहिवासी राजू गेल्या 15 वर्षांपासून गोंदियातील रामनगर परीसरातील वसंत टॉलमध्ये भाड्याने राहात होता. रेल्वे स्थानकाजवळील जैन बेकरीसमोर दागिने बनविण्याचे त्याचे दुकानही होते. सुमारे दहा वर्षांचा कालखंड हा अनेकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पुरेशापेक्षाही अधिक आहे. अशात राजुने ते आतापर्यंत कधी केले नाही, ते अचानक आता का केले हा खरा प्रश्न आहे.

दागिने घडविणाऱ्या राजुला गोंदियातील 11 सराफा व्यापाऱ्यांनी सोन्याचे लगड व हिरे दिले. परंतु दागिने न तयार करता कारागीर सोने व हिरे घेऊन पसार झाल्याचा त्याच्यावर ठपका आहे. याप्रकरणी शनिवारी (ता. 20) शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सराफा व्यापाऱ्यांना गंडविणारा सोनार गोंदियातूनही पळाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजू शहरातील सराफा व्यापाऱ्यांचे सोने गोळा करून त्यांचे दागिने तयार करण्याचे काम करीत होता. 2 जानेवारीला त्याने येथील 11 व्यापाऱ्यांकडून सोन्याचे लगड व हिरे स्वीकारले. त्यानंतर तो गायब झाला. 18 जानेवारीपर्यंत तो गोंदियातच होता. परंतु त्यानंतर अचानक दुकान बंद करून राजू गायब झाला.

रामनगरातील त्याच्या भाड्याच्या खोलीलाही कुलूप आहे. घरमालकालाही तो कुठे गेला याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता त्याला पश्चिम बंगालमध्ये शोधण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. विशेष म्हणजे त्याचा फोनही बंद आहे. त्यामुळे राजुच्या भोवती संशयाचे वलय तयार झाले आहे. राजू सामंताजवळ 493 ग्राम सोन्याचे लगड सोने व चार हिरे आहेत. मनोज ज्वेलर्सचे संचालक रजत अग्रवाल (वय 24, रा. गोरेलाल चौक) यांनी 260 ग्राम वजनाची आणि 13 लाख रुपये किमतीची सोन्याची लगड राजुला दुकानात नेऊन दिली होती. त्यातून राजुला तीन हार आणि अंगठ्या बनविण्याची ऑर्डर दिली होती. राजुने दागिने बनविण्यासाठी 15 दिवस लागतील, असे सांगितले होते. 15 दिवसांनंतरही त्याने ते दागिने आणून दिले नाही. व्यापाऱ्याचा फोनही उचलला नाही. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला.

Gold & Diamond Items.
Gondia : सरकारला लाचखोरांचा पुळका; गोंदियात 31 कर्मचारी सेवेत पुनर्स्थापित

कुणाल गिरीशभाई सोनी (रा. रामनगर, गोंदिया) यांची 13 ग्राम वजनाची सोन्याची फॅन्सी चेन किंमत 65 हजार रुपये, आशिष प्रकाश जैन (रा. गोंदिया) यांचे 8 ग्राम वजनाचे सोने किंमत 40 हजार रुपये, नितेश पवन सोनी (रा. गोंदिया) यांचे 15 ग्राम वजनाचे सोने व 1 पन्ना रत्न किंमत 75 हजार रुपये, रचित शांतिचंद जैन (रा. गोंदिया) यांच्या 2 अंगठ्या वजन 8 ग्राम, 1 कानातील टॉप्स, 15 ग्राम शुद्ध सोने किंमत एक लाख 45 हजार रुपये, योगेश महेश वर्मा (रा. गोंदिया) यांचे 15 ग्राम सोने व 4 हिरे किंमत 90 हजार रुपये, वीरेंद्र रमेश सोनी (रा. गोंदिया) यांचे 48 ग्राम शुद्ध सोने किमत 2 लाख 40 हजार रुपये, प्रतीक मदन रॉय (रा. गोंदिया) यांचे 75 ग्राम शुद्ध सोने किमत 3 लाख 75 हजार रुपये, पंकज गिरीश गणात्रा (रा. गोंदिया) यांचे 6 ग्राम शुद्ध सोने किमत 30 हजार रुपये, राहुल राकेश गुप्ता (रा. गोंदिया) यांचे 10 ग्राम शुद्ध सोने किमत 50 हजार रुपये, हिमांशू प्रफुल्ल वस्तानी (रा. गोंदिया) यांचे 10 ग्राम शुद्ध सोने किंमत 50 हजार रुपये देखील राजुजवळ आहे.

शहरातील या सर्वांचा ऐवज घेऊन राजू गायब झाला आहे. त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिरे व सोन्याचा अपहार केल्याची तक्रार गोंदिया शहर पोलिसात देण्यात आली आहे. तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे करीत आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

Gold & Diamond Items.
Gondia : पूर्व विदर्भातील साहित्यिकांना डावलले; स्वतंत्र राज्याची मागणीचा पुन्हा पेटणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com