Bhandara News : जुने पालकमंत्री आले; पण नवे गायबच ! भंडाऱ्याचे नशीबच खराब

Devendra Fadnavis News : नवे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने एकच चर्चा झाली
Vijaykumar Gavit, Devendra Fadnavis News
Vijaykumar Gavit, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Bhandara Guardian Minister News : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकाच मंत्र्यांवर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी होती. त्यामुळे ते त्या जिल्ह्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत. यावरून विरोधी पक्षांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता नव्याने झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून राज्य सरकारमध्ये अनेक रुसवे-फुगवे असल्याची चर्चा आहे. भंडारा जिल्ह्यातील कार्यक्रमाला जुने पालकमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते, पण नवे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने एकच चर्चा झाली.

भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमध्ये दोनदिवसीय वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात होत आहे. भारतीय जनता पक्षाचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे हे स्वतः या महोत्सवाचे आयोजक आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्या सोबत माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुकेही उपस्थित झाले. मात्र, नवनियुक्त पालकमंत्री विजयकुमार गावित (Vijay Gavit) यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे नशिबच खराब असून, जुने पालकमंत्री फडणवीस आले, पण नवनियुक्त पालकमंत्री गावित यांनी दांडी मारल्याचे दिसून आले.

Vijaykumar Gavit, Devendra Fadnavis News
Assembly Election 2024 : मोठी बातमी ! लोकसभेपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय भूकंप, केंद्रस्थान नागपूर ?

राज्यात नुकतीच 12 पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. त्यात भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सहा जिल्ह्यांची जबाबदारी होती. त्यांच्याकडील पालकमंत्रिपद आदिवासी विकासमंत्री गावित यांना देण्यात आले आहे. तेव्हापासून भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा नाराजी पाहायला मिळत आहे. भाजप (BJP)ने पुन्हा एकदा बाहेरचा पालकमंत्री दिल्याची ओरड सुरू झाली आहे. यात प्रकर्षाने भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिंदे गटाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी याबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक पालकमंत्री असला तर जिल्ह्यासाठी निधी अधिक आणता येतो, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळते, असे मत भोंडेकर यांनी व्यक्त केले होते. दरम्यान, भाजपकडून भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री विजयकुमार गावित यांची पाठराखण केली आहे. स्वत: खासदार मेंढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत गावित जिल्ह्यात झेंडा मंत्री ठरणार नाही ते जातीने लक्ष देतील, असे म्हटले होते. असे असताना मात्र आज साकोली येथे आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री गावित यांनी दांडी मारल्याने विश्वास करावा तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आल्यावर प्रोटोकॉलनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री हजर असने गरजेचे आहे. मात्र, असेही झाले नाही. पालकमंत्रिपदाबाबत भंडारा जिल्ह्याचे नशीब चांगले नाही हेच योग्य. येणाऱ्या प्रत्येक सरकारकडून भंडारा जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा, ही अपेक्षा सतत केली जाते. स्थानिक पालकमंत्री मिळेल आणि जिल्ह्याचा विकास होईल, अशी अपेक्षा असते. मात्र, प्रत्येक वेळी भ्रमनिरास झाला आहे. गावित यांच्याबाबत अनेक अपेक्षा भाजपने नागरिकांना दाखवल्या आहेत. त्या पूर्ण होतील, हीच अपेक्षा.

Edited by : Amol Jaybhaye

Vijaykumar Gavit, Devendra Fadnavis News
Caste Census News : 'इंडिया' आघाडी करणार भाजपची कोंडी; लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com