प्रशांत किशोर यांच्या सोबत आशिष देशमुख नव्याने उभारणार स्वतंत्र विदर्भाची चळवळ !

मी प्रशांत किशोर यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझ्या प्रस्तावाला होकार दिला असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिली.
Prashant Kishor and Dr. Ashish Deshukh
Prashant Kishor and Dr. Ashish DeshukhSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर देशात विख्यात आहेत. २०१४ साली मोदींचा विजय असो किंवा त्यानंतर पंजाब, बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्लीच्या निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती यशस्वी राहिली आहे. त्यांनी विविध राज्यात राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यामध्ये मदत केली. यावेळी तुम्ही नवीन राज्य निर्माण करण्यासाठी मदत करू शकाल का, हे विचारण्यासाठी मी प्रशांत किशोर यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझ्या प्रस्तावाला होकार दिला असल्याची माहिती कॉंग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून विदर्भाच्या (Vidarbha) ११ जिल्ह्यांमध्ये वेगळ्या विदर्भासाठी माझ्यासह काम करणाऱ्या लोकांची एक टिमसुद्धा त्यांना भेटून आली आहे. त्यांनी त्यांचा अहवाल प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना दिला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात झुम मिटींगच्या माध्यमातून त्यांनी आम्हा सर्वांना संबोधित केले. २८ सप्टेंबर १९५३ साली नागपूर (Nagpur) करार झाला होता. त्यानुसार विदर्भ महाराष्ट्रात (Maharashtra) सम्मीलित झाला. तेव्हा विदर्भाला दिलेली आश्‍वासने कुठेही पाळली जात नाहीत. विदर्भाच्या जनतेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अन्याय होत असल्याची भूमिका जनतेला बघायला मिळत आहे.

विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा, छत्तीसगडासारखी राज्ये झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. तेथील ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अतिशय चांगले होत आहे. विकासासाठी लहान राज्य चांगले मानले गेले आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास व्हावा. त्यासाठी विदर्भ स्वतंत्र राज्य झाले पाहिजे, यासाठी प्रशांत किशोर रणनीती आखतील. ही एक चळवळ उभी राहणार आहे आणि ही चळवळ यशस्वी करण्यासाठी ते रणनीती आखतील. येत्या २८ सप्टेंबरला नागपुरात त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे, असे ते म्हणाले.

विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावे, ही येथील जनतेच्या मनातील इच्छा आहे. यापूर्वी कितीतरी माध्यमातून ही बाब पुढे आली आहे. विदर्भ स्वतंत्र राज्य होण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. येथील नेत्यांमध्ये स्वतंत्र विदर्भाबाबत इच्छाशक्ती जागृत व्हावी, यासाठी रणनीती आखण्यात येणार आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी यशस्वीपणे काम केलेले आहे. आता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत.

Prashant Kishor and Dr. Ashish Deshukh
हिवाळी अधिवेशनात डॉ. आशिष देशमुख विदर्भासाठी मांडणार ‘हा’ मुद्दा…

गडकरी, फडणवीसांनीही केली होती मागणी..

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या काही दशकांपासून रेटली जात आहे. काही वर्षांपूर्वी स्वतंत्र विदर्भाची मागणी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ही मागणी केली होती. भारतीय जनता पार्टी स्वतंत्र विदर्भ राज्याची समर्थक एके काळी होती. सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे सर्व अधिकार असतानासुद्धा वेगळे विदर्भ राज्य का स्थापन केले जात नाहीये, हे कळत नाही. पण आता त्यांच्यामध्ये देखील ही राजकीय इच्छाशक्ती जागृत होईल, हा विश्‍वास आम्हाला प्रशांत किशोर यांनी होकार दिल्यानंतर आला असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

प्रशांत किशोर बिहारचे आहेत. पण ते पंजाब, बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दिल्ली आदी राज्यांमध्ये गेले आणि तेथे सरकार स्थापनेमध्ये आपली रणनीती त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. ज्या राजकीय पक्षासोबत ते राहतात, ते पक्ष निवडणुकांमध्ये विजयी झालेले आपल्याला बघायला मिळाले आहे. आता त्यांच्या माध्यमातून विदर्भ वेगळा होणार असेल, तर विदर्भातील प्रत्येकाने त्यांचे स्वागतच केले पाहिजे. विदर्भाच्या दोन कोटी जनतेकडून आता अपेक्षा आहे, असे डॉ. आशिष देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com