Ashish Deshmukh News : कॉंग्रेस, गांधी परिवार सगळेच ओबीसी विरोधी, भाजपमध्ये येताच आशिष देशमुखांनी डागली तोफ !

Nana Patole : नाना पटोले यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली नाही.
Dr. Ashish Deshmukh
Dr. Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Dr. Ashish Deshmukh criticizes Congress and Patole : कॉंग्रेसमधून निष्कासीत केलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आज (ता. १८) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सोहळ्यात त्यांनी कॉंग्रेस, गांधी परिवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली नाही. (Dr. Ashish Deshmukh joined Bharatiya Janata Party today)

कॉंग्रेसवर तोंडसुख घेताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची तोंडभरून स्तुती केली. ते म्हणाले, विकासासाठी झपाटलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. २००९मध्ये जेव्हा प्रवेश कस्तुरचंद पार्कवर माझा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. तेव्हा नितीन गडकरींनी मला पश्‍चिम नागपूरमधून लढायला सांगितले होते.

दरम्यान काय झाले माहिती नाही अन् शेवटच्या क्षणी सावनेरात पाठवले. त्यांच्या आदेशाप्रमाणे मी तेथे गेलो. कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि जनतेनेही आशीर्वाद दिला. पण तेव्हा थोडक्यात विजयाची संधी हुकली. २०१४मध्येही तसेच झाले अखेरच्या क्षणी पुन्हा मला काटोलला पाठवले. तेथे मी निवडणूक आणि जिंकलो. त्यानंतर जे झालं, ते व्हायला नको होतं, असे आशिष देशमुख म्हणाले.

ठाकरेंनी खंजीर नाही, तर तलवार खुपसली..

विदर्भासाठी फडणवीसांचं मुख्यमंत्री असणं गरजेचं होते. पण २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत फक्त खंजीर नाही खुपसला, तर तलवार टाकली. ही तलवार त्यांनी विदर्भात टाकली. म्हणजेच विदर्भद्रोह त्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवायची आहे. फडणवीस नागपूर किंवा विदर्भापुरते मर्यादित नाहीत. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पातून त्यांनी मुंबई शहर आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन ठेवले आहे, असे देशमुख म्हणाले.

Dr. Ashish Deshmukh
Dr. Ashish Deshmukh : ‘मी त्याच्याकडं पाहिलं, तर तो तिकडं पाहात होता’, प्रवेशाच्या कार्यक्रमातही पटोलेंना लगावले टोले !

‘त्या’ प्रदेशाध्यक्षाचा एकही फोन नाही..

‘कॉंग्रेसमध्ये (Congress) असेपर्यंत त्या प्रदेशाध्यक्षाचा एकही फोन आला नाही. अन् मी लावतो, त लागतंच नाही.’ असे म्हणत देशमुखांनी (Ashish Deshmukh) पुन्हा पटोलेंना टोला लगावला. प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माझ्या मागे लागले.

सातत्याने ते माझ्याशी संपर्क करत होते. त्यांनी मला एकदा नरखेडमध्ये पकडलं त्यानंतर अनेक ठिकाणी ते मला स्वतः भेटले. बहुप्रतिभावान, ऊर्जावान बावनकुळेंमुळे मला भाजपमध्ये येण्याची प्रेरणा मिळाली, असे डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com