Ashish Deshmukh News : ...त्यामुळे आशिष देशमुखांची अवस्था म्हणजे, ‘जाना था जापान पहुँच गये चीन'

BJP Vidharbha Politics : भाजप प्रवेशाच्या वेळी आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र निवडणूक जाहीर होता...
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Saoner Assembly Constituency: अनेकांना राजकीय धक्के देणारे भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांना यावेळी भाजपने यावेळी धक्का दिला आहे. काटोल विधानसभा मतदारसंघासाठी अडून बसलेले माजी आमदार आशिष देशमुख यांना भाजपने सावनेर विधानसभेच्या तिकीट दिले आहे. यामुळे ‘जाना था जापान पहुँच गये चीन' अशी अवस्था त्यांची झाली आहे.

आशिष देशमुख(Ashish Deshmukh) काटोलचे आमदार होते. मात्र त्यांनी मध्येच भाजप सोडली. पाच वर्षांचा कार्यकाळसुद्धा त्यांनी पूर्ण केला नाही. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. एवढेच नव्हे तर पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

काँग्रेसमध्येही ते स्वस्थ बसले नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच डोक्यावर घेतले. राहूल गांधी यांना ओबीसी समाजाची माफी मागावी असा सल्ला देऊन त्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

Ashish Deshmukh
Nagpur BJP : ...अन् दक्षिणचा आमदार पाठवला पश्चिममध्ये! नागपुरात भाजप श्रेष्ठींचा कार्यकर्त्यांनाच धक्का

काँग्रेसने निलंबित केल्यानंतर ते परत भाजपात परतले. भाजप प्रवेशाच्या वेळी आपण निवडणूक लढणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र निवडणूक जाहीर होताच देशमुख यांनी काटोलवर दावा करणे सुरू केले. यावरून भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर आणि देशमुख यांच्यात चांगलेच खटके उडाले होते.

तर आपले तिकीट पक्के झाल्याचेही ते सांगत होते. काटोलच्या उमेदवारीसाठी सुरू असलेली मारामारी बघता भाजपने सोमवारपर्यंत सस्पेंस कायम ठेवल होता. देशमुखांचा पत्ता कट झाल्याचेही बोलले जात होते. धरसोड वृत्ती आणि अस्थिर निष्ठेमुळे देशमुखांना यावेळी उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र देशमुखांनी हार मानली नाही. काटोलसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. भाजपने(BJP) त्यांना उमेदवारी दिली मात्र काटोलऐवजी सावनेर विधानसभा मतदारसंघाची.

Ashish Deshmukh
Pooja Khedkar: पूजा खेडकरचे वडील 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार!

आशिष देशमुख यापूर्वी सावनेर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वीसुद्धा निवडणूक लढले आहेत. सुनील केदारांना(Sunil Kedar) त्यांनी चांगलेच झुंजवले होते. त्यानंतर ते काटोलमध्ये गेले. आता पुन्हा त्यांना भाजपचे सावनेरमध्ये पाठवले आहे. यावेळी त्यांचा सामान माजी मंत्री सुनिल केदार यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीसोबत होणार आहे. विशेष म्हणजे सावनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांचे वडील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख हे निवडून आले होते. केदार यांनी त्यांचा पराभव केला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com