Ashish Deshmukh : आशिष देशमुखांचा वळसे पाटलांवर गंभीर आरोप; महायुतीला घरचा आहेर...

Ashish Deshmukh on Sunil Kedar : दिलीप वळसे पाटील आणि सुनील केदार हे जुने मित्र आहेत. त्यांचे हितसंबंध असल्याने मंगळवारची सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगून देशमुखांना महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
Sunil Kedar, Ashish Deshmukh
Sunil Kedar, Ashish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेले माजी मंत्री सुनील केदार यांना वाचवण्याचे काम राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील करीत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार तसेच भाजपचे प्रवक्ते, ओबीसी सेलचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केला. वळसे पाटील आणि सुनील केदार हे जुने मित्र आहेत. त्यांचे हितसंबंध असल्याने मंगळवारची सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगून देशमुखांना महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

केदारांवर 150 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. शिक्षेला स्थगिती द्यावी याकरिता केदार उच्च व सर्वोच्च न्यायालयात (Suprime Court) गेले होते. दोन्ही न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. सहकार विभागाच्यावतीने त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार आज त्यावर सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र ती काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्‍याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Mahayuti News : भाजप शिंदेच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला डच्चू देणार?

सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडून शेतकऱ्यांचे 150 कोटी रुपये तत्काळ वसूल करण्यात यावे अशी मागणी आशिष देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली. दोन महिन्यांच्या आत व्याजासह ही रक्कम वसूल करावी आणि शेतकऱ्यांना परत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याकरिता 2 ऑगस्टपासून सावनेर येथे शेतकरी बेमुदत उपोषण करणार असल्याचाही त्यांनी इशारा दिला.

Sunil Kedar, Ashish Deshmukh
Raj Thackeray : विधानसभेची उमेदवारी कोणाला? मनसेने सुरू केली चाचपणी

केदार आणि देशमुख यांचे सुरुवातीपासूनच राजकीय वैर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री रणजित देशमुख यांना केदारांनी सावनेर मतदारसंघात पराभूत केले होते. वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आशिष देशमुख यांनी केदारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी अतिशय अटीतटीचा सामना झाला होता. यादरम्यान काही जाळपोळीच्या घटनासुद्धा घडल्या होत्या. त्यामुळे देशमुखांचा विजय थोडक्यात हुकला असे बोलले जाते. न्यायालयाने दोषी ठरवल्याने केदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द झाले आहे. पाच वर्षांसाठी त्यांना आता निवडणूक लढता येणार नाही. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) हे भाजपचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मानले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com