Bacchu Kadu MahaElgar : ना बावनकुळे, ना महाजन, CM फडणवीसांनी बच्चू कडूंसोबतच्या चर्चेसाठी शोधला नवा संकटमोचक

Bacchu Kadu MahaElgar : नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे. सरकारने त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री आशिष जयस्वाल यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातून माजी मंत्री बच्चू कडू नागपूरमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांना मुंबईला चर्चेसाठी येण्याचे सरकारचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. चर्चाच करायची असेल तर नागपूरमध्ये या असा उलट संदेश त्यांनी पाठवला आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.

एरवी अशा संकटात मुख्यमंत्री जलसंपदा गिरीश महाजन किंवा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिष्टाईसाठी पाठवतात. यावेळी मात्र त्यांनी नवा संकटमोचक यासाठी निवडला आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री तसेच गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना बच्चू कडू यांची समजूत काढण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांना कडू कितपत दाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बच्चू कडू यांनी यापूर्वीसुद्धा कर्जमाफीसाठी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गावी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे अमरावतीचे पालकमंत्री या नात्याने त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले होते. शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत हेसुद्धा गेले होते. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी उपोषण स्थगित केले होते.

त्यानंतर कडू यांनी पावसाळी अधिवेशनात कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने करावी अशी मागणी केली होती. या दरम्यान त्यांनी पुन्हा शेतकरी यात्रा सुरू केली होती. यावर कडू यांची नौटंकी अशी टीका त्यावेळी बावनकुळे यांनी केली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये नेहमीच शाब्दिक टीकाटीपणी सुरू असते. आणखी वाद वाढू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना लांब ठेवले असल्याचे सांगण्यात येते.

आशिष जयस्वाल शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आहेत. शिवाय कायद्याचे अभ्यासकही आहेत. शासनादेश काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते शिवसेनेचे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही तेवढ्याच जवळचे आहेत. भाजपमध्ये अनेक मंत्री व नेते असतानाही त्यांनी गडचिरोलीचे सह पालकमंत्री म्हणून जयस्वाल यांची निवड केली. यावरून फडणवीस आणि त्यांचे किती जवळचे संबंध आहेत हे स्पष्ट होते.

पण आता एवढा मोर्चा आणि आंदोलन हातळण्याची जयस्वाल यांची ही पहिलीच वेळ आहे. फटकळ स्वभावाच्या आणि कर्जमाफीसाठी कुठलीही तडजोड केली जाणार नाही यासाठी टोकाची भूमिका घेणाऱ्या बच्चू कडू यांची ते कशी समजूत काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com