Shivsena : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाचा निकालच चर्चांना विराम लावेल !

Shivsena : अन्याय झाल्यामुळे मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार शिवसेनेतून बाहेर पडले.
Ashish Jaiswal
Ashish JaiswalSarkarnama

MLA Ashish Jaiswal News : बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. दरम्यान प्रत्येक जण आपआपला दावा करणारच आहे. पण या विषयात न्यायालय योग्य निकाल देईल, असे शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्य नेता हे जे पद धारण केले आहे, तसे पदच शिवसेनेत नाही. ते सर्व नीच लोक आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता आमदार जयस्वाल नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, त्यावेळी महाराष्ट्रात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, त्याला एक परिस्थिती कारणीभूत आहे. कुठेतरी अन्याय झाल्यामुळे मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार शिवसेनेतून बाहेर पडले.

आमदार, खासदार हे जनतेमधून निवडले गेलेले प्रतिनिधी आहेत आणि कायद्यानुसार व निवडणूक आयोगाच्या दृष्टीने जनतेने निवडून दिलेले लोक महत्वाचे आहेत. दुसरीकडे जिल्हाप्रमुख किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी हे नियुक्त केलेले असतात. निकाल देताना नियुक्त केलेल्या लोकांचा विचार होणार नाही, तर जनतेने निवडून दिलेल्या लोकांचा म्हणजेच आमचा विचार होणार आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार, नगरसेवक हे लोकच निर्णयाच्या वेळी महत्वाचे ठरणार आहेत, असे आमदार जयस्वाल म्हणाले.

निवडून आलेले पदाधिकारी कुणाच्या बाजूने जास्त संख्येने आहेत, या आधारावर हा निकाल लागण्याची शक्यता जास्त आहे. इतर राजकीय पक्षांमध्ये जिल्हाप्रमुख, अध्यक्ष किंवा इतर पदे निवडणुकीच्या माध्यमातून भरली जातात. पण शिवसेनेमध्ये तसे काहीही नाहीये. एखादा व्यक्ती सामनामध्ये रुजू झाला की तो पदाधिकारी होतो. त्यामुळे हे प्रकरण आता अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट झालेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा लॅंडमार्क निकाल यावर येणार आहे.

Ashish Jaiswal
अनंत गुढे म्हणाले, आशिष जयस्वाल हा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक, मंत्रिपद मिळेल...

भारताच्या (India) संविधानात आणि निवडणूक आयोगाच्या नियमांत जे आहे, त्यानुसारच हा निर्णय लागेल आणि हा निर्णय सर्व राजकीय (Political) पक्षांना लागू राहणार आहे. कोणताही राजकीय पक्ष कुणाची वैयक्तिक मालमत्ता राहू शकत नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांचा असतो, सर्व सक्रिय सभासदांचा पक्ष असतो. या प्रकरणात न्यायालयाचा (Court) निकाल बोलका राहणार आहे आणि सर्व चर्चांना हा निकालच विराम लावणारा असेल, असे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com