

Ashok Chavan News : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ते आपल्याबरोबर सतरा आमदार घेऊन आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी जोरदार चर्चा आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांचेही नाव आहे. दरम्यान आपण कुठल्याही स्थितीत कॉँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
आज (ता. 12) आमदार सुभाष धोटे राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी तालुक्यातील चेकबोरगाव येथे एका कार्यक्रमात होते. यासंदर्भात ‘सरकारनामा’ने त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. माझे संपूर्ण घराणे हे कॉँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले आहे. आमचे पूर्वज कॉँग्रेस विचारधारेचे आहेत. त्यामुळे कुणी कोणत्याही पक्षात जात असले तरी आपण कॉँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण सुभाष धोटे यांनी दिले आहे.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याची बातमी आली. अन् राज्याच्या राजकारणात एकच एक चर्चा सुरू झाली. याबाबत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आगे आगे देखो होता होता है क्या?’, असे सूचक वक्तव्य मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. यानंतर अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे सतरा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांचाही समावेश त्या १७ जणांमध्ये असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. दरम्यान आता आमदार सुभाष धोटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अशी कुठलीही भूमिका घेऊ नका, असे आपण अशोक चव्हाण यांना सांगितले होते, असेही आमदार धोटे म्हणाले.
आमदार सुभाष धोटे भाजपमध्ये जाणार अशी बातमी आल्यानंतर राजुरा विधानसभा मतदारसंघात विरोधकांनी हा विषय चांगलाच ट्रोल केला होता. आपण पक्ष सोडला नाही. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशीही माझं बोलणं झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आमचा एकही कार्यकर्त्या काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे सुभाष धोटे यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.