Akola Crime news | ठाकरे गटाचे महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला

राजेश मिश्रा आणि अहिर गटात काही क्षुल्लक कारणावरुन कारणांवरून वाद झाला.
Akola Crime news |
Akola Crime news |
Published on
Updated on

Akola Crime news | अकोल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश मिश्रा आणि अहिर गटात काही क्षुल्लक कारणावरुन कारणांवरून वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारी झालं. पण यावेळी अनेकांच्या हातात लोखंडी पाईप आणि तलवारी होत्या. या वादाला पूर्ववैमन्सय, जागेच्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या वादात जखमींना आधी सर्वोपचार रुग्णालयात परंतु नंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

शिवसेनेचे मनपातील माजी गट नेते तथा पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा हे रविवारी (ता. २५) घराजवळ उभे असताना जवळच राहणाऱ्या एका गटाने त्यांच्याशी वाद घातला. त्यामुळे मिश्रा यांचे समर्थकही तिथे आले. क्षणातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मिश्रा यांच्यासाेबत असलेल्या एका युवकाने स्वत:वर पाईप-काठीने हाेत असलेला हल्ला अडवल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. जखमींना खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या गटातील व्यक्ती जखमी झाल्याची चर्चा आहे.

Akola Crime news |
Akola Crime News| अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या

वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले पोलिस ठाण्यात पोहचले. तर हल्ला झाल्यानंतर राजेश मिश्रा जुने शहर पाेलिस ठाणे गाठले. त्यांच्यापाठोपाठ शहरातील शिवसैनिकांनीही पाेलिस ठाण्यात गर्दी केली आहे. यात जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, युवा सेनेचे राहुल कराळे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, तरूण बगेरे, गजानन बाेराेळे, नितीन मिश्रा आदींचा समावेश हाेता. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पाेलिस अधीक्षक माेनिका राऊत यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात पोहचल्या आहेत.

दरम्यान, काही दोन महिन्यांपुर्वीच म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर दोन अज्ञातांनी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्या घटने नंतर पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारचा हल्ला झाल्याने अकोल्या पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com