Akola Crime News| अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या

Akola Crime News| ऱामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके या घटनेचा तपास करत आहे.
Vishal Kaple
Vishal Kaple

Akola crime अकोला : अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर दोन अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील जठारपेठ भागात रविवारी (३० ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर कपले यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही माहिती मिळताच खासगी रुग्णालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण कपले यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले. वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके या घटनेचा तपास करत आहे.

Vishal Kaple
गोयल यांना अधीक्षकपदाचा पदभार दिल्यावर डॅा. देशमुखांनी पुण्याबद्दल व्यक्त केली खास शब्दात कृतज्ञता...

दरम्यान हल्ला करणाऱ्यांमधील दोघेजणमोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल तात्कर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. बस स्थानक (टावर चौक) ते मोठी उमरी परिसर हा गर्दीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील जठारपेठ चौकात विशाल कपले यांची दोन अज्ञातांनी हत्या केली.

विशाल कपले उमरी परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असायचे. अनेक सामाजिक उपक्रमांबरोबरच रक्तदानासारख्या उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. विशाल यांनी काही दिवसांपूर्वीच मोठी उमरी, गुडधी परिसरात अनेक हॉटेलवर सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबतही आवाज उठवला होता. यासंदर्भात प्रशासनाकडे त्यांनी निवेदनही दिल्याची माहिती मिळाली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com