Nagpur East Assembly Constituency: काँग्रेस नेत्यांचं ‘तुतारी’ विरोधात रणशिंग; नागपूरकर चांगलेच संतापले...

Congress vs NCP SP: दक्षिण नागपूरसाठी भांडत बसलेल्या काँग्रेस नेत्यांना पूर्व नागपूर केव्हा हातून गेले हे कळलेच नाही.
Sharad Pawar, Nana Patole
Sharad Pawar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर शहरात एकही जागा मिळणार नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या काँग्रेसच्या नाकावर टिच्चून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला.

राष्ट्रवादीने शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या हाती तुतारी दिल्याने त्यांच्या समर्थकांचा सध्या शहरात जल्लोष सुरू असला तरी काँग्रेसमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. काही नेते ताताडीने दिल्लीवारीला निघाले असून पुन्हा एकदा येथे ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पंधरा वर्ष राज्यात सत्ता होती. त्यानंतरच्या एका विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता आघाडी एकत्रितच लढली. मात्र पंचवीस वर्षात एकदाही नागपूर शहरात विधानसभेसाठी मतदारसंघ सोडण्यात आला नव्हता.

मात्र यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. दक्षिण नागपूरसाठी भांडत बसलेल्या काँग्रेस नेत्यांना पूर्व नागपूर केव्हा हातून गेले हे कळलेच नाही. दक्षिण जिंकले मात्र तहात पूर्व नागपूर गमावले, अशी स्थिती काँग्रेसची झाली आहे.

Sharad Pawar, Nana Patole
Ajit Pawar News : अमरावती जिल्ह्यातील 'या' विद्यमान आमदारालाच अजितदादांनी ठेवलं 'होल्ड'वर

राष्ट्रवादीचा शहरात एकच नगरसेवक आहे. राजकीय अस्तित्व नसल्याने मतदारसंघ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते. हा मतदारसंघ सोडल्यास सांगली पॅटर्नचा इशाराही देण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारीसुद्धा चांगलेच भडकले होते. आम्ही काँग्रेसच्या फक्त सतरंज्या उचलायच्या का, असा सवाल करून आमची ताकद दाखवून देऊ असा इशाराही दिला होता.

काहीही झाले तरी काँग्रेसच्या हातून हा मतदारसंघ जाणार नाही, असेच नेत्यांना वाटत होते. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी येथून लढण्यास उत्सुक आहेत. त्यांचे नाव आघाडीवर होते. मात्र बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ सोडल्याचे कळताच सर्वच काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे.

Sharad Pawar, Nana Patole
Mahayuti News: माजी मंत्री बडोलेंचा काल पक्षप्रवेश, आज राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

नागपूर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ आहे. ग्रामीणचे नेते केदारांना हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याकडे घ्यायचा होता. त्या बदल्यात शहरातील पूर्व नागपूर राष्ट्रवादीला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हिंगणा मतदारासंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग दोन वेळा निवडूण आले होते. पंचवीस वर्षांपसून येथे राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. पूर्व नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे बुथसुद्धा नाहीत. फक्त एक नगरसेवक आहे. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ देणे म्हणजे पराभव ओढून घेणे असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com