Maharashtra Vidhan Sabha Election: महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महायुती व भाजपच्या बंडखोरांची आम्ही समजूत घातली आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतील. उमरेमधून माजी आमदार राजू पारवे यांच्याशी चर्चा झाली आहे.
मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिकृत उमेदवारच्या विरोधात रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना कोण माघार घ्यायला लावणार? असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसचे नेते फसवत असल्याचा आरोप केला.
बावनकुळे म्हणाले, परवा आमची बैठक झाली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील निवडणूक संचालन समितीचे सर्व सदस्य त्यात उपस्थित होते.सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी एकच उमेदवार निवडणूक लढू शकतो असे त्यांना समजावून सांगण्यात आले आहे.
भाजपचे जे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ज्यांनी अर्ज भरले त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात आली आहे. यानंतरही जे उमेदवारी मागे घेतल्या नाही त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना फक्त टोमणे मारणे आणि आरोप करणे एवढेच येते. आता त्यांचे कोणी ऐकत नाही. शरद पवारांचा अजेंडा काय? उद्धव ठाकरे यांचे धोरण काय? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात काय? याची कोणालाच माहिती नाही. महायुतीच मुख्यमंत्री पदाकरिता निवडणूक लढत नाही. राज्यातील 14 कोटी जनतेसाठी आम्ही निवडणूक लढत आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भावना सुरुवातीपासून भाजपसोबत आहोत. जरांगे यांचे आंदोलन सामाजिक आहे. या आंदोलनाला राजकारणाशी जोडू नये. सदा सरवणकर यांच्या बाबत मला काही माहिती नाही. राज ठाकरे आपल्या शैलीने बोलतात. ते टोलेबाजी करीत असतात. एखाद्या वेळी राज ठाकरे यांनी वेगळ्या भूमिका घेतल्या असेल मात्र राज्याच्या विकासासाठी ते आमच्या सोबत असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.