MNS Political News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यात आहेत. काल ( गुरुवारी) त्यांनी चंद्रपूरमध्ये बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे गेल्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीवरून दोन गटात राडा झाला.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या बैठकीत सचिन भोयर यांच्या विरोधात मन सैनिकांनी राडा घातला त्यांनाच विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोयर यांच्या उमेदवारीने मनसेतील अंतर्गत धुसफूस आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सचिन भोयर हे माजी नगरसेवक आहेत. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत ते दोन वेळा निवडून आले होते.
मनसेने चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले. चंद्रपूर विधान सभा मतदारसंघातून मनदीप रोडे आणि राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर या दोन उमदेवरांची नावे मनसेने जाहीर केली आहेत.
राज ठाकरे यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. उमेदवारांची चाचपणी आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (ता.22) त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत भोयर आणि रोडे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. भोयर यांच्या नावाला राजुरा येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता.
भोयर हे चंद्रपूरमध्ये राहातात. राजुऱ्यात त्यांचे काय काम, अशी विचारणा स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. राज ठाकरे सभा आटोपून बाहेर पडताच या मुद्द्यावर वरून भोयर समर्थक आणि विरोधक भिडले. त्यांच्या तुफान हाणामारी झाली. त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते. राज ठाकरे सर्वांना समज देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. दरम्यान शुक्रवारी जाहीर झालेल्या दोन उमेदवारांच्या नावांमध्ये भोयर यांचे नाव असल्याने सर्वांनाच धक्का बसला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.