Bacchu Kadu News : दिव्यांग मेळाव्याकडे पाठ फिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींची बच्चू कडूंनी केली पाठराखण !

Mahatma Gandhi : महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे कार्य हे व्यापक होते.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Political News : यवतमाळ - दारव्हा मार्गावरील चिंतामणी खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. (Bachu Kadu took serious notice of the statement of Adv. Gunaratna Sadavarte)

या विषयावर बोलताना सर्वांना विचारूनच मेळाव्याची तारीख घेतली होती. इतर कार्यक्रमांमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे दिव्यांगांबद्दल त्यांच्या भावना चांगल्या नाहीत, असे म्हणता येणार नसल्याची स्पष्टोक्ती आमदार कडूंनी दिली. दिव्यांग मेळाव्याप्रसंगी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी येथे केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे कार्य हे व्यापक होते. महात्मा गांधी यांच्यावर तुलनात्मक टीका करणे योग्य नाही. सदावर्तेंनी याचे भान ठेवले पाहिजे. त्यांच्या विधानावरून सदावर्तेंनी पुस्तके वाचली की नाही, असा प्रश्न पडतो.

असे विधान करणाऱ्या सदावर्तेचं समाजासाठी योगदान काय, असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. आज महात्मा गांधींबद्दल टीका झाली. उद्या कुणी बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलेल. त्यामुळे हा प्रकार थांबविला पाहिजेस असेही कडू म्हणाले.

प्रहारचा मुख्यमंत्री होण्यात गैर काय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. तसे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे वाटण्यात गैर काय, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर उद्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा, असे वाटेल. तेव्हा प्रहारचा मुख्यमंत्री होईल, असेही ते म्हणाले.

बोगस दिव्यांग हुडकून काढणार...

यवतमाळ जिल्ह्यात अनेकांनी कुठलेही व्यंग नसताना दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले आहे. त्याआधारे ते शासनाच्या अनेक सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत. ही बाब या वेळी प्रहार शिक्षक संघटनेने आमदार बच्चू कडू यांच्या लक्षात आणून दिली. या वेळी आमदार कडू यांनी बोगस दिव्यांग हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

Edited By : Atul Mehere

Bacchu Kadu
Bacchu Kadu News : अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या बच्चू कडूंनी गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांचे केले तोंडभरून कौतुक !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com