Bacchu Kadu News : मुख्यमंत्र्यांची अडचण पाहून मंत्रिपदावरील दावा सोडला; पण या आमदाराला मंत्री करा, बच्चू कडूंची नवी मागणी

आगामी पाच वर्षे तरी मी लोकसभा लढवणार नाही : बच्चू कडू
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Cabinet Expansion : आमचे मित्र आणि नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण पाहता त्यांचा आग्रह असला तर मी मंत्रिपदावरील दावा सोडतो आहे. मित्राची अडचण होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मात्र, कोणतीही अडचण होत नसेल तर आमच्या पक्षाचे आमदार राजुकमार पटेल यांना राज्यमंत्री करता आलं तर करावं, अशी भावना प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. (Seeing difficulty of CM, I gave up claim on ministerial position : Bacchu Kadu)

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे दिल्ली गेले आहेत. दिल्लीत माध्यमाशी बोलताना त्यांनी मंत्रिपदाबाबत (Minister) भाष्य केले. ते म्हणाले की, मी आता मंत्रीपद मागणार नाही. त्यांची अडचण दूर व्हावी. सगळेच रांगेत उभे राहिले तर नेता, मित्र अडचणीत येतो. त्यामुळे मित्राची अडचण होऊ नये; म्हणून मी मंत्रिपदावरील दावा सोडतो आहे.

Bacchu Kadu
Maharashtra Monsoon Session : मुख्यमंत्र्यांकडील खातं शंभूराज देसाईंकडं आलं अन्‌ शेलार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांनी घेरलं...

आमच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री देता आलं अथवा विधानसभेच्या समितीवर अध्यक्ष म्हणून घेता आला तर चांगलं राहील. त्यातही त्यांना अडचण होत असेल तर तेही देऊ नये. पण सहज देता आलं तर माझ्याऐवजी राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री दिले तर चांगलं होईल. आम्हाला मात्र शहीद परिवार, दिव्यांग बांधव आणि अनाथ यांच्यासाठी काम करता यावे, म्हणून ताकद द्यावी. मतदारसंघातील प्रश्नासाठी मदत करावी. त्यासंदर्भात आमची चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा आमची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून एक धोरण ठरवणार आहोत,असेही आमदार कडू यांनी स्पष्ट केले.

Bacchu Kadu
NDA Meeting : भाजपचा जानकर, खोतांना धक्का; NDAच्या बैठकीचे निमंत्रण नाही, जानकर म्हणाले, ‘मी भीक मागणार नाही...’

आगामी पाच वर्षे तरी मी लोकसभा लढवणार नाही. पुढच्या पाच वर्षांनंतर मी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचार करेन, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे. ‘पंतप्रधानांनी ग्रामीण भागात गेलं पाहिजे. पावसावर आधारित शेतीसाठी केंद्र सरकारने चांगलं धोरण आखलं पाहिजे. शेतकऱ्यांना एमआरएसोबत जोडता येईल का. दिव्यांग मंत्रालय केंद्र सरकारमध्येही निर्माण व्हावं. दिव्यांगांना केंद्र सरकारने दोन रुपयांऐवजी एक हजार रुपये द्यावेत. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागातही लागू करावी, अशा मागण्याही आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Bacchu Kadu
Barshi News : बार्शी मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा;फडणवीस समर्थक आमदाराच्या अडचणी वाढणार

राणा दांपत्यांना एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण नाही

नवनीत राणा आणि रवी राणा यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं निमंत्रण नाही. मी त्याबाबत काही सांगू शकत नाही. भाजपच्या लोकांना विचारलं पाहिजे. मला का बोलावलं, हे मलाही माहिती नाही. पण, बोलावलं तर आपण गेलं पाहिजे. सन्मान दिला, त्याबद्दल भाजपचे मी आभार मानतो. त्यांना का बोलावलं नाही, हे मला माहिती नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com