Bacchu Kadu On Ravi Rana : 'ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या रवी राणांचा बच्चू भाऊंनी मोजक्या शब्दांतच विषय संपवला

Bacchu Kadu Vs Ravi Rana : लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव झाला आहे. यानंतर रवी राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत.
Bacchu Kadu |Ravi Rana
Bacchu Kadu |Ravi Ranasarkarnama

नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच भाष्य करत आमदार रवी राणा यांनी थेट आमदार बच्चू कडू यांच्यावर 'प्रहार' केला होता.

'ब्लॅकमेलर' बच्चू कडूंना अमरावतीमधील जनता धडा शिकवेल, असा इशारा रवी राणांनी दिला होता. याला बच्चू कडूंनी ( Bacchu Kadu ) मोजक्या शब्दांत उत्तर देत विषयच संपवला आहे.

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपच्या नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बूब, अशी तिरंगी लढत झाली होती. पण, वानखेडेंनी 5 लाख 20 हजार 149 मते घेत विजय मिळवला. त्यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांचा 18 हजार 495 मतांनी पराभव केला. राणा यांना 5 लाख 1 हजार 654 मते मिळाली. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दिशेन बूब यांनी 84 हजार 985 मते घेऊन राणांच्या विजयाचे समीकरण बिघडवले होतं.

रवी राणा काय म्हणाले?

या पराभवानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेतून रवी राणांनी ( Ravi Rana ) बच्चू कडूंवर हल्लाबोल केला होता. "बच्चू कडूंचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत तोडपाणी करण्यात आली. मला काय मागितलं, कशापद्धतीनं दिनेश बूब यांना उभे करण्यात आलं, त्यासाठी कुठून-कुठून वसुली केली, कुठून पैसे आले याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे," असं राणांनी म्हटलं.

Bacchu Kadu |Ravi Rana
Navneet Rana : मी हारूनही जिंकले! नवनीत राणा असं का म्हणाल्या...

"कडू ब्लॅकमेलर"

"महाराष्ट्रात तोडपाणी, ब्लॅकमेलिंग करून वसुली करण्यात कडूंचा ( bacchu Kadu ) एक नंबर आहे. ज्या ताटात खातात, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम कडूंनी केल आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भोगून कडू खोक्यासाठी बाहेर पडले. विधानसभेला कडूंनी 20 जागा लढविण्याची घोषणा करून महायुतीला ब्लॅकमेंलिंग करण्याचं काम सुरू केलं आहे," अशी टीका राणांनी केली होती.

"न्यायालयात आरोप सिद्ध करावेत"

राणांच्या आरोपांवर बच्चू कडू म्हणाले, "सगळ्याचं उत्तर न्यायालयात देऊ. आम्ही विधानसभा निवडणूक झाल्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. दोन दिवसांत रवी राणांना अब्रुनुकसानीची नोटीस जाईल. त्यांनी केलेले आरोप न्यायालयात सिद्ध करावेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com