Bacchu Kadu On Ajit Pawar : बच्चू कडूंनी अजितदादांनी सुनावले; ‘बापानं आश्वासन दिलं, तरी ते पोट्याला पाळावंच लागतं’

Farmer Loan Waiver Issue : अजित पवार यांच्या बारामतीनंतर आम्ही पंकजा मुंडे यांच्या परळीत, त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर आणि शेवटी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत.
Ajit Pawar-Bacchu Kadu
Ajit Pawar-Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Akola, 03 May : ‘आश्वासन तुम्ही जरी दिलं नसेल. पण तुम्हाला ज्यांनी (भाजप) सत्तेच्या खुर्चीवर बसवलंय त्यांनी दिलंय ना. आता नाही म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाप हा भारतीय जनता पक्ष आहे आणि बापाने जर आश्वासन दिलं, तर ते पोठ्याला पाळावंच लागतं,’ असा टोला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरून राज्याच्या राजकारणात जोरदार रणकंदन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, मजूर यांच्या प्रश्नावर माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे आक्रमक झाले आहेत. ते राज्याच्या चारही विभागात आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही कडू यांनी दिला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार’ असं कुठलंही आश्वासन आमच्या पक्षाकडून देण्यात आलेला नाही, असे विधान केले आहे. त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टिकेची झोड उठताना दिसत आहे. राजू शेट्टी यांनीही काल अजित पवार यांच्या हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी अजितदादांना सुनावले.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Jaykumar Gore case : गोरे बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट; रामराजे अन्‌ संबंधित महिलेच्या संभाषणाची क्लिप व्हायरल, धक्कादायक विधाने आली समोर

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीपासून ते अर्थसंकल्पाचे वाचन करणार आहेत. राज्याच्या सुमारे सात लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये दिव्यांग, शेतकरी, मजुरीच्या वाट्याला किती रक्कम आली आहे, हे आम्ही मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या योजना दहा ते पंधरा हजार कोटींच्या वर जात नाहीत. मजुरीसाठी तर कायच दिलं नाही. गेली ७५ वर्षांपासून ही व्यवस्था आहे, त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar-Bacchu Kadu
Raj Thackeray : 'त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या'; एल्फिन्स्टन पुलाजवळील नागरिकांना ठाकरेंकडून मोठा दिलासा

अजित पवार यांच्या बारामतीनंतर आम्ही पंकजा मुंडे यांच्या परळीत, त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या घरासमोर आणि शेवटी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी दहा-दहा हजारांच्या सभा होतील, असे आमचं नियोजन आहे. तेथून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेात, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com