Bachchhu Kadu News : "जवळच्या माणसानेच पंकजा मुंडेंचा घात केला”; बच्चू कडूंचा निशाणा कुणावर ?
Amaravati News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याची माहिती दिली.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पूर्वी मला जवळचं नीट दिसत नव्हतं, आता मला चांगलं दिसायला लागेल, असं मिश्किल टिपण्णीही पंकजा मुंडे यांनी केली आहे. या वक्तव्याचे आता राजकीय अर्थ काढले जात आहेत. (Latest Marathi News)
यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडेच्या वक्तव्याबाबत विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “पंकजा मुंडेंचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता. त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं” असा सल्ला कडू यांनी दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
व्हिडीओमध्ये पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
पंकजा मुंडे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा?”
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

