Pankaja Munde News : 'मी थांबणार नाही' म्हणणाऱ्या पंकजा मुंडे परिक्रमा यात्रेनंतर का थांबल्या,भाजपची आडकाठी ?

Pankaja Munde BJP Maharashtra Politics : पंकजा मुंडे यांचे पुढचे पाऊल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Beed Political News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सप्टेंबरमध्ये शिवशक्ती परिक्रमा केली होती. यावेळी शिवशक्ती परिक्रमा केलेल्या ठिकाणी येणार आणि राज्यात सर्वांना सोबत घेणार असे त्यांनी म्हटले होते. आता दोन महिने झाले तरी पंकजा मुंडे कुठे फिरताना दिसल्या नाहीत.

दरम्यान, त्यांच्या फिरण्याला भाजपची आडकाठी असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यांना ओबीसी मेळाव्यालाही जाऊ दिले नाही. पण समर्थकांच्या जिवावर त्यांनी फिरण्याचा प्रण केला आहे. आता त्या कधी बाहेर पडणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Pankaja Munde
Eknath Shinde Beed : भाजप, राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या बीडमध्ये मुख्यमंत्री शिंदे आठवड्यातच दोनदा

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी जोरदार चर्चा होती. पण त्यांना मंत्रिपद मिळालेच नाही. मंत्रिमंडळ विस्तारावेळीही त्यांचे नाव घेतले जात होते. पण अजूनही त्या मंत्रिपदापासून दूर आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

पक्षात डावलले जात असल्याने पंकजा मुंडे यांनीही अनेकदा अप्रत्यक्ष आपला संताप व भावना व्यक्त केल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी पंकजा यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. शक्तीपिठांच्या या दर्शन यात्रेला त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला. याच काळात त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत जीएसटी प्रकरणी जप्तीच्या कारवाईची प्रक्रिया घडली. यामुळे पंकजा यांच्या समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

पंकजा मुंडे यांनीही या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली होती. मागच्या काळात फिरत नसल्याबाबतची कारणेही त्यांनी सांगितली होती. विनाकारण लुडबुड आवडत नाही, आपल्यावर कोणती जबाबदारी नाही, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते.

भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा झाला. आपण मैदानात असून कोणीच रोखू शकणार नाही, असे आव्हान पंकजांनी दिले होते. शिवशक्ती परिक्रमा यात्रा निघाली त्या भागात आपण येणार आहोत. आता आपण घरात बसणार नाही. थकणार नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असे सांगत राज्यात दौरा करण्याचे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही अप्रत्यक्ष आव्हान दिले होते.

पंकजा यांचा मेळावा होऊन एक महिना झाला. अद्याप त्यांच्या दौऱ्याचा कुठलाही कार्यक्रम आलेला नाही. भाजपकडून त्यांना दूर ठेवले जातेय हेही लपून नाही. मध्य प्रदेश भाजपच्या सहप्रभारी असूनही त्या मध्य प्रदेश निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीतही दिसल्या नाहीत.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये जाळपोळ व दगडफेक झाली होती. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी या घटनांच्या नुकसानीची पाहणी करून संबंधीतांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. ‘आता थांबणार नाही, मैदानात येतेय’ हा केलेला प्रण त्या कधीपासून सुरू करणार हे महत्त्वाचे आहे.

Pankaja Munde
Suresh Kute : इनसाइड स्टोरी, द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंना घेरण्यासाठी भाजपने असं टाकलं जाळं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com