Bachchu Kadu : लोकसभेत सगळ्या जागा भाजप लढवेल, बच्चू कडूंचा खळबळजनक दावा !

Amravati Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आमची फार काही राजकीय मैत्री नाही. आम्ही फक्त विकासासाठी शिंदे यांच्यासोबत गेलो आहे. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतही नाही. आमची बांधिलकी फक्त जनतेसोबत आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu : प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतात, ते त्यांच्या बेधडक आणि धाडसी वक्तव्यांमुळे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडू यांनी भाजपला इशारा देत खळबळजनक विधान केले आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना जागावाटपासाठी महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, यातच 35 जागा भाजप लढवत असलेल्या चर्चा राज्यभर असताना भाजप सगळ्याच जागा कमळ या चिन्हावर लढवणार असल्याचा मोठा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. भाजप सगळ्याच जागा लढवणार असून, त्या ठिकाणी माणसं मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची असतील, असाही खळबळजनक दावा आज (ता. 6) बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bachchu Kadu
Bachchu Kadu News : आंबेडकरांच्या 'त्या' विधानावर बच्चू कडू म्हणाले, जरांगेंनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवावी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आमची फार काही राजकीय मैत्री नाही. आम्ही फक्त विकासासाठी शिंदे यांच्यासोबत गेलो आहे. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतही नाही. आमची बांधिलकी फक्त जनतेसोबत आहे. जनता म्हणेल तसं आम्ही पुढे जाऊ, असेही या वेळी बच्चू कडू यांनी सांगितले. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजप किती जागा देईल? होऊ शकते की राज्यात सगळ्याच जागा भाजप लढवू शकते. मात्र, त्या ठिकाणी माणसं हे एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे लोक राहू शकतात. त्या ठिकाणी चिन्ह मात्र कमळ राहू शकते, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

भाजपला इशारा?

मागील काळामध्ये शिवसेनेने 18 ते 20 जागा लोकसभेच्या लढवल्या होत्या. मात्र, आता 35 जागा जर भाजप लढवत असेल तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दिसली पाहिजे की नाही? सोबत ठेवून जर ते बगलेत दाबून ठेवत असेल तर मग बिचवा काढायची वेळ यायला नको, असे विधानसुद्धा या वेळी बच्चू कडू यांनी केले. या वक्तव्यामुळे बच्चू कडू यांनी एक प्रकारचा इशाराच भाजपला दिला असल्याचं दिसून येत आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची निवडणूक लढवायची मानसिकता नसून आमच्यासाठी लोकसभेपेक्षा विधानसभा महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. मात्र, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अकोला व अमरावती या दोन जागांसाठी तयारी करत असल्याचे सूतोवाच बच्चू कडू यांनी केले.

Edited By : Atul Mehere

R

Bachchu Kadu
Bachchu Kadu Become Aggressive : पहिले 'त्या' योजना बंद करा, बच्चू कडू कडाडले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com