Bachchu Kadu On Patole : उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजितदादांना CM पदाची ऑफर देणाऱ्या पटोलेंना बच्चू कडूंनी 'जागा'च दाखवली

Bachchu Kadu Political News : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर देत राजकीय धुळवड खेळली.
Bachchu Kadu On  Nana Patole .jpg
Bachchu Kadu On Nana Patole .jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्यासोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर देत राजकीय धुळवड खेळली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण शुक्रवारी (ता.14) दिवसभर ढवळून निघालं. पण विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेला आकडा गाठण्यातही अपयश आलेल्या काँग्रेसच्या नाना पटोलेंना आता माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) जागाच दाखवली आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर दिलेल्या नाना पटोलेंसह (Nana Patole) काँग्रेसलाही डिवचलं. ते म्हणाले,नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही,असा चिमटाही त्यांनी काढला.

कडू पुढे म्हणाले, काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत.नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे.पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे.जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत खाली कोणी हलणार नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Bachchu Kadu On  Nana Patole .jpg
MLC Election : एकनाथ शिंदे शब्द पाळणार! आत्महत्या करायला निघालेल्या नेत्याला आमदारकी देणार?

यामागचं कारण सांगतानाच ते म्हणाले, कारण ईडीचे जे फटके आहेत, त्याची या सर्वांनाच भीती आहे. त्यामुळे काँग्रेसची ऑफर स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही असा खोचक टोलाही माजी आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.

नाना पटोले काय म्हणाले होते...?

नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, सध्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यांचा पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोघांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे.

Bachchu Kadu On  Nana Patole .jpg
MLC Election: भाजपच्या गोटातून मोठी अपडेट; विधानपरिषदेसाठी मराठवाड्याला संधी, 'या' दोनपैकी एक नाव होणार फायनल ?

देशात ज्यांच्यासोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम त्यांनी केलं आहे. भाजपने एकनाथ शिंदेंच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे दोघांनी सावध रहावं, आम्ही त्यांच्यासोबत आहोत." तर यावेळी पटोलेंनी दोन्ही नेते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवू अशी थेट ऑफर दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com