Bachchu Kadu On Minister : छातीवर तलवार ठेवली तरी मंत्री होणार नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Rajkumar Patel May Include In Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारावर कडूंचा काडीचाही विश्वास नाही
Bachchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Bachchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदावर (राज्यमंत्री) राहिलेल्या बच्चू कडूंना शिंदे-फडणवीस सरकारनेही मंत्रिपदाचा शब्द दिल्याचे बोलले जाते. आपल्या वाट्याला मंत्रीपद येणार असल्याचे बच्चूभाऊंनी अनेकदा सांगून टाकले. पण, या सरकारला आता सव्वावर्षे झाले; तरी मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही. मात्र, बच्चूभाऊंची आशा कायम राहिली. त्यांच्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबतचे आठजण मंत्री झाले. परंतू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एकाही आमदाराला काही मिळाले नाही. तरीही, विस्तार होण्याचे दावे ठोकले जात आहेत. त्यावर बच्चूभाऊ काडीचाही विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यावर बच्चूभाऊ ठाम आहे. म्हणून ते आता छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद घेणार नसल्याचे सांगत आहेत. (Latest Political News)

Bachchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ajit Pawar Shirdi : अमित शाहांनी वीस वर्षे रखडलेले काम झटक्यात केले; साखर कारखान्यांबाबत अजितदादांची स्पष्टोक्ती

महाविकास आघाडीत राज्यमंत्री असणार बच्चू कडू (Bachcchu Kadu) शिवसेनेतील बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अशा कडूंना होती, मात्र ती फोल ठरली. यानंतर थेट राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्या आणि आठजणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली.

आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या वतीने मंत्र्यांना डिनरचे आमंत्रण देण्यात आले आहे. यावर बोलताना कडू म्हणाले, "मी मंत्री नसल्याने मला आमंत्रण दिले नसेल. त्याचे मला काही वाईट वाटत नाही. तसाही मला आता मंत्री होण्यात काही इंटरेस्ट राहिला नाही. तशी वेळ आली तर आमदार राजकुमार पटेलांना मंत्री करेन", असे म्हणत कडूंनी आपण नाराज असल्याचेच स्पष्ट केले.

Bachchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांनी बीडमध्ये ताकद दाखवली अन् अजितदादांनी देवगिरीवर बैठक बोलवली !

पहिल्या मंत्रिमंडळात वर्णी न लागलेल्या शिंदे गटातील काही आमदारांसह बच्चू कडूंना दुसऱ्या विस्तारात स्थान मिळणार असल्याचा विश्वास होता. मात्र वारंवर हा विस्तार विविध कारणांनी पुढे जात असल्याचे दिसून आले. या घोळातच अचनाकच २ जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आठजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी बच्चूभाऊंनी आपली नाराजी जाहीरपणे उघड करत शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला होता. "मागून आलेल्यांना जेवण मिळाले मात्र आधी आलेल्यांना हातात ताट घेऊन रांगेत ताटकळत ठेवले", असे म्हणत कडूंनी अजितदादांच्या सत्तेतील सहभागावर प्रतिक्रिया दिली होती.

Bachchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Sandeep Kshirsagar Speech : शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांच्या पायाशी राहीन; संदीप क्षीरसागरांचे भावनिक भाषण

दरम्यान, तिसरा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असल्यातरी बच्चूभाऊ त्यावर काही केल्या विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला असला दर्जा असणे आणि कॅबिनेट मंत्री असणे यात जमीन-आसमानाचा फरक कडूंनी सांगितला. आता आपल्याला मंत्री होण्यात कुठलाही रस नाही, असेही कडूंनी स्पष्ट केले आहे. "माझ्या छातीवर कुणी तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही, शपथ घेणार नाही. आमंत्रण आलेच तर प्रहारचे आमदार राजकुमार पटेलांना मंत्री करेन पण मी होणार नाही," असे सांगत बच्चूभाऊंनी शिंदे-फडणवीस सरकारवरील नाराजी स्पष्ट केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com