Bachchu Kadu On Sambhaji Bhide: एकनाथ शिंदेंनी घडाघडा बोलावं ; संभाजी भिडेंच्या वादात बच्चूभाऊंनी मुख्यमंत्र्यांना ओढलं

Sambhaji Bhide Controversy: भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
Eknath Shinde, Bachchu Kadu,
Eknath Shinde, Bachchu Kadu,Sarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu Statement: महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांचा सर्वच पक्षातून विरोध होत आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

"कुठल्याही व्यक्तीने राष्ट्रपुरुषांबाबत बोलताना आपली औकात काय आहे ,हे पाहणे गरजेचे आहे. संभाजी भिडे यांचे स्वातंत्रलढ्यात कुठलेही योगदान नाही. स्वातंत्र्यानंतर सुराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. सामान्य माणसांसाठीही त्यांनी काहीही केलेले नाही," असे बच्चू कडू म्हणाले.

Eknath Shinde, Bachchu Kadu,
Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमधील गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू

"महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानकारक विधान करून त्यांना बदमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक होणे गरजेचे आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे बच्चू कडू यांनी नमूद केले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजीवर कारवाई करण्याचे आश्वासन रविवारी दिले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Eknath Shinde, Bachchu Kadu,
Sambhaji Bhide Controversial Statement : अटकपूर्व जामिनासाठी संभाजी भिडेंची न्यायालयात धाव..

संभाजी भिडे यांच्या विरोधात आमदार यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठिया आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता अडवला. संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com