Bachchu Kadu On BJP government : फडणवीसांचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर; बच्चू कडू रस्त्यावर, पेटवला सोयाबीन अन् कर्जमाफीसाठी 'अल्टीमेटम'

Bachchu Kadu Protests in Amravati Against Devendra Fadnavis Flood Relief Package in Maharashtra : भाजप महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर बच्चू कडू यांनी टिका करत आंदोलन केलं आहे.
Bachchu Kadu On BJP government
Bachchu Kadu On BJP governmentSarkarnama
Published on
Updated on

Amravati protest news : भाजप महायुती सरकारने राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजवर राज्यात सर्वात वेगवान अन् तीव्र प्रतिक्रिया कोणी दिली असेल, तर ती बच्चू कडू यांनी.

बच्चू कडू यांनी अमरावती इथं रस्त्यावर उतरत, जाहीर केलेले पॅकेज ही बनवाबनवी असल्याचे म्हणत, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन पेटवत निषेध केला आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी सरकारच्या पॅकेजचा निषेध केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या फोडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, "हे पॅकेज बनवाबनवीच आहे का की अजून कायच हे निष्पन्न होत नाही. आमचं आंदोलन कर्जमुक्तीचं होतं, आमचा एमएसपीच्या 20% बोनस देण्याचं होतं, दिव्यांगांचे होतं, मच्छिमारांच होतं, मेळ मेंढपाळांचा होतं, आज मार्केटमध्ये सोयाबीन तीन हजार रुपये, कापूस सहा हजार रुपये आहे, अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही." 11000 रुपयाचा कापूस सहा हजार रुपये मार्केटमध्ये विकावा लागतो. सोयाबीन तीन हजार रुपयाला विकावं लागते, मग याची नुकसान भरपाई देणार कोण? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार? असा प्रश्न करता, या सर्व मुद्द्यासाठी आम्ही नागपूरला (Nagpur) 28 तारखेला मोठा मोर्चा काढणार आहोत, आम्ही परत येणार नाही, आम्ही नागपूर चारही बाजूने घेरल्याशिवाय राहाणार नाही, कर्जमुक्ती शिवाय आमचे पाय परतणार नाही, जेवढे दिवस थांबायचे आम्ही तेवढे दिवस नागपुरात थांबू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Bachchu Kadu On BJP government
Flood Relief Proposal Maharashtra : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव कधी? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'तो मोठा फाॅरमॅट...'

राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी आता निर्णय घेतला आहे. राज्यात 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी 68 लाख 79 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे.

Bachchu Kadu On BJP government
Shivsena politics : नगराध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा, माजी मंत्र्याच्या वक्तव्यामुळे महायुतीत अंतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता?

68 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान

राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी आता निर्णय घेतला आहे. राज्यात 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी 68 लाख 79 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे.

राज्य सरकारकडून मदतीच्या जाचक अटी शिथिल

भाजप महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 31 हजार 628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजमध्ये 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळांमधील अतिवृष्टीग्रस्त धारकांचा समावेश असणार आहे. या मदतीत दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी आणि 65 मिलिमीटरची अट ठेवलेली नाही, असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com