
Chandrapur News: राज्यातील अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षांनी पावसाची पाहणी करण्यासाठी आपले आपले नेते प्रतिनिधी म्हणून नेमले आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके ताताडीने चंद्रपूरमध्ये रवाना झाले आहेत. प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडूही (Bachchu Kadu) येथे दाखल झाले. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या तातडीने मदत देण्यासाठी पैसे घेऊन आलो नाही, या वक्तव्याचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला.
माजी आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी (ता.24) गिरीश महाजन यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, गिरीश महाजन हे भाजपसाठी संकटमोचक असतील, मात्र आज शेतकरी मोठ्या संकटात आहे. त्यामुळे महाजन यांनी आपली जीभ आवरून शेतकऱ्यांचे संकटमोचक व्हावं, असा सल्ला त्यांना दिला.
बच्चू कडू म्हणाले, गिरीश महाजन (Girish Mahajan) ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून मंत्रिमंडळात आहेत. भाजपचे संकटमोचक म्हणून त्यांना ओळखले जाते. मात्र पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी शब्द जपून वापरावे. शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. होते नव्हते तेहीसुद्धा त्यांनी गमावले आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांचे सांत्वन करण्याची गरज आहे. मात्र, महाजनांसारखे नेते त्याऐवजी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यांना चांगले बोलता येत नसेल, तर किमान शेतकऱ्यांचा अपमान तरी करू नये, अशा शब्दात बच्चू कडू यांनी महाजनांना सुनावले.
बच्चू कडू तीन महिन्यांपासून सातत्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करीत आहेत. यापूर्वी त्यांनी उपोषणसुद्धा केले होते. त्यांच्या मागणीवरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात एक समिती नेमली आहे. योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बच्चू कडू यांनी कर्जमाफीची ही वेळ योग्य असल्याचं म्हटलं आहे. आता परतीच्या पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. मराठवाड्यानंतर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यावरून पुन्हा एकदा विरोधक सक्रिय झाले आहेत. काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पूर परिस्थिती पाहण्यासाठी नेत्यांची नियुक्ती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.