BSP Parmeshwar Gonare Warning : 'गद्दारांनो स्वतःहून 'बसपा'तून बाहेर पडा, अन्यथा...' ; प्रदेशाध्यक्ष गोन्नारेंचा इशारा!

Bahujan Samaj Party state president Parmeshwar Gonare : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बसापच्या उमेदवाराला ३० हजार मतांचाही आकडा पार करता आला नाही.
Bahujan Samaj Party  state president Parmeshwar Gonare
Bahujan Samaj Party state president Parmeshwar GonareSarkarnama

Bahujan Samaj Party and Maharashtra Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे, तर सत्ताधारी महायुतीला मात्र मोठा फटका बसला आहे. या दोघांव्यतिरिक्त महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनीही निवडणूक लढवली मात्र या पक्षांना कुठेही यश मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर बसपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या खराब कामगिरीवरून पक्षातील गद्दारांना इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला मानहानीजनक पराभव, घटलेली मतांची टक्केवारी तसेच दिवसेंदिवस पक्षाचे महत्त्व कमी होत चालल्याने बसपाच्या प्रदेश अध्यक्षांनी गद्दारांनी स्वत:च पक्षातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा निष्कासन निश्चित असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात बसापच्या(Bahujan Samaj Party state president) उमेदवाराला 30 हजार मतांचाही आकडा पार करता आला नाही. नागपूर शहरात 10 नगरसेवक असताना बसपाच्या उमेदवाराला फक्त 23 हजार मतेच घेता आली. विशेष म्हणजे नागपूर आणि रामटेक दोन्ही मतदारसंघात बपसाने मिशनरी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्याचा दावा निवडणुकीपूर्वी केला होता.

Bahujan Samaj Party  state president Parmeshwar Gonare
Lok Sabha Election 2024 : नागपुरात गडकरी, ठाकरेंच्या विरोधात बसपा लावतेय जोर !

काँग्रेसच्या संविधान बचाव आंदोलनामुळे बसपाचे नुकसान झाल्याचा दावा उमेदवारांचा आहे. मात्र त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हे मान्य नाही. बसपाच्या उमेदवारांनी भाजपला मदत केल्याचा त्यांचा आरोप आहे. जाहीर आरोप-प्रत्यारोपामुळे आतापर्यंत पाच ते सात पदाधिकाऱ्यांना पक्षातून निष्काशित करण्यात आले आहे. आता बसपाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोन्नारे( Parmeshwar Gonare) यांनी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी बसपात प्रवेश केलेल्या आणि पदे घेऊन मिरवणाऱ्यांना स्वतःहून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Bahujan Samaj Party  state president Parmeshwar Gonare
Lok Sabha Election 2024 : ताई-वहिनींच्या लढतीत बसपा एन्ट्री करणार

भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी बसपाच्यावतीने फक्त मिशनरी कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांना निवडूण आणण्यासाठी आजपासूनच संघटन बांधणी व प्रशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे.

यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती(Mayawati) यांच्याकडे महाराष्ट्रातील गेल्या 40 वर्षांपासून अपयशाची कारणे सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रात संघटन बांधणी व प्रशिक्षण साठी तांत्रिक अडचणी निर्माण करणाऱ्या व अन्य पक्षांच्या हस्तक म्हणून बीएसपीमध्ये शिरकाव करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल. यासाठी विशेष अधिकार मायावती यांच्याकडून प्राप्त करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गोन्नारे यांचे म्हणणे आहे.

बसपाची देशपातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक येणाऱ्या 23 जूनला लखनऊ येथे आयोजित केली आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र स्तरावर केवळ मिशनरी कार्यकर्त्यांची एक विशाल बैठक घेण्यात येईल. त्यात मिशनरी कार्यकर्त्यांनाच विधानसभेची उमेदवारी निश्चित करण्यात येईल व एक रणनिती सुनिश्चित केली जाईल. हे जवळपास ठरले असल्याने मिशनरी कार्यकर्त्यांनी आपला विधानसभेचा मतदार संघ निश्चित करावा आणि संघटनात्मक बांधणीला सुरुवात करावी. सर्वांना प्रशिक्षित करावे अशाही सूचना गोन्नारे यांनी दिल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com