Balapur APMC Election Result: ठाकरेंचे फायरब्रॅंड नेते नितीन देशमुखांनी वंचितचा उडवला धुव्वा...

Nitin Deshmukh News: नितीन देशमुख यांच्या पॅनलने एकहाती सत्ता आणली.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Balapur Bazar Samiti Election: अकोला जिल्ह्यातील बाळापूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीवर पुन्‍हा एकदा शेतकरी सहकार गटाने वर्चस्व राखले आहे. तर वंचित बहुजन आघाडी प्रणित शेतकरी परिवर्तन गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. येथे शिवसेना - उद्धव ठाकरेंचे फायरब्रॅंड नेते नितीन देशमुख यांच्या पॅनलने एकहाती सत्ता आणली.

बाळापूर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकीमध्‍ये अनेक दिग्‍गजांची प्रतिष्‍ठा पणाला लागली होती. गत वीस वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार गटाचे वर्चस्व आहे. असे असताना पुन्हा एकदा या निवडणुकीतदेखील सहकारने वर्चस्व कायम ठेवले आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.

बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी (ता. ३० एप्रिल) रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा लागला. त्यामध्ये १८ जागांपैकी १६ जागांवर सहकारने वर्चस्व निर्माण केले आहे, तर दोन ठिकाणी वंचित प्रणित शेतकरी परिवर्तन गटाला विजय मिळवता आला आहे. (Latest Vidarbha News)

मतदानाची प्रक्रिया शहरातील धनाबाई विद्यालयात पार पडली. बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालकांच्या जागा असून १ उमेदवार बिनविरोध निवडून दिला होता. त्यामुळे १७ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यासाठी ३७ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. यांपैकी सहकार व परिवर्तनने सर्वच्या सर्व १८ जागी उमेदवार दिले होते.

Nitin Deshmukh
Chandur Bazar APMC Result : बच्चू कडूंनी बबलू देशमुखांना खातेही उघडू दिले नाही, एकहाती आणली सत्ता !

धनाबाई महाविद्यालयात मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर १७ पैकी १५ जागांवर सहकारने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. तर परिवर्तन गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (APMC Election) सेवकराम ताथोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. (Political Short Videos)

नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे (Shivsena) सह संपर्कप्रमुख सेवकराम तातोड आणि शिंदे गटाचे संदीप पाटील होते. त्यांनी योग्य रणनिती आखून वंचितला (Vanchit Bahujan Aghadi) रोखले. (Bazar Samiti Election Results)

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com