Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

Balu Dhanorkar News: आज दुपारी दीड वाजता पार्थिव वरोऱ्यातील निवासस्थानी आणणार, उद्या अंत्यसंस्कार !

Balu Dhanorkar died during treatment in the morning: वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Warora News: चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज (ता. ३०) पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांचे पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. (Will be brought to Varora residence at 1.30 pm.)

आज (ता. ३०) रोजी दुपारी २ वाजतापासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर ३१ मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या ४७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं उपचार सुरू होते. धानोरकर यांना नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Death News : मोदी लाटेतही भाजपच्या दिग्गज नेत्याचा पराभव करत धानोरकर ठरले होते 'जायंट किलर'...

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना त्यांनी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात भाजपच्या (BJP) दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचं पाठबळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकारकरीत्या बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले होते

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com