Balu Dhanorkar Death News : मोदी लाटेतही भाजपच्या दिग्गज नेत्याचा पराभव करत धानोरकर ठरले होते 'जायंट किलर'...

Maharashtra Congress News : चार दिवसांपूर्वीच धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं होतं.
Balu Dhanorkar Death News
Balu Dhanorkar Death NewsSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur : चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचं वयाच्या ४७ वर्षी मंगळवारी (दि.३०) पहाटे निधन झालं. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर काही दिवसांपासून पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं उपचार सुरु होते.लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. मात्र, 2019 ला मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का देत चंद्रपूर मतदारसंघातून खासदार झाले होते.

काँग्रेस (Congress) खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना रविवारी( दि.२८) नागपूर इथून एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं सकाळी एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचं पार्थिव चंद्रपुरात आणण्यात येणार आहे. उद्या वरोरा धानोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Balu Dhanorkar Death News
Congress's Questions to BJP : नऊ वर्षांच्या भाजप सरकारला काँग्रेसचे नऊ प्रश्न; पंतप्रधान मोदींवर निशाणा

चार दिवसांपूर्वीच बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. वडिलांच्या अंतिम संस्कारासाठीही ते भद्रावती येथे जाऊ शकले नव्हते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच धानोरकर यांचं निधन झाल्यामुळे पिता-पुत्राच्या लागोपाठ जाण्यानं धानोरकर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तसेच एक तडफदार युवा नेतृत्वाच्या अचानक जाण्यानं राजकीय क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचं पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे आज (दि.३०) दुपारी १.३० वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. दुपारी २ वाजेपासून ३१ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर ३१ मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Balu Dhanorkar Death News
Nana Patole Latest News : कसब्याप्रमाणेच पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही नाना पटोलेंनी हेरुन ठेवला उमेदवार; तयारीही सुरु झाली अन्...

असे ठरले जायंट किलर....

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर(Balu Dhanorkar) हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. मात्र, 2019 ला मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत धानोरकर हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभवाचा धक्का देत चंद्रपूर मतदारसंघातून खासदार झाले होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राहिले होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता.

मोदी लाटेतही शिवसेना, काँग्रेसला वाढवलं...

मोदी लाटेतही आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)मुख्यमंत्री असताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अगोदर शिवसेना आणि नंतर काँग्रेस वाढविण्यात धानोरकर यांचं योगदान उल्लेखनीय होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचं विस्तारलेलं जाळं आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकारकरित्या धानोरकर हे भाजपला पराभवाचा धक्का देत राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com