Balu Dhanorkar News : केंद्र सरकारने जाणूनबुजून हेलिकॉप्टर्स दिले नाहीत, म्हणून घडली ‘ती’ घटना !

Pulwama : त्यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur's MP Balu Dhanorkar News : पुलवामा घटनेत सीआरपीएफने केंद्र सरकारकडे हेलिकॉप्टर्सची मागणी केली होती. परंतु, गृहमंत्रालयाने हेलिकॉप्टर्स देण्यास नकार दिला. त्यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले. त्यात ४० जवानांचा नाहक बळी गेला. माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूला मोदी सरकारच जबाबदार आहे. कारण सरकारने जाणूनबुजून हेलिकॉप्टर्स दिले नाहीत, असा थेट आरोप चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी केला. (Chandrapur MP Balu Dhanorkar made the direct allegation)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर ‘जवाब दो मोदी, जवाब दो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात आज कस्तुरबा चौकात हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खासदार धानोरकर बोलत होते. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यात वापरल्या गेलेल्या स्फोटकांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. याबाबत सीबीआयने काय अहवाल दिला, हे अजुनही गुलदस्त्यात आहे.

देशाचा पैसा लुटून नेणाऱ्या भगोड्यांना एका जाहीर सभेत राहुल गांधींनी चोर म्हटले. त्यामुळे सुरतच्या उच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मोदींनी मोठ्या तत्परतेने राहुल गाधींची खासदारकी रद्द करून सरकारी घरदेखील रिकामे करण्यास सांगितले. या प्रकरणात अपिलासाठी ३० दिवसांचा अवधी असूनही, केंद्र सरकारने एवढी घाई कशासाठी केली, हा मह्त्वाचा प्रश्न आहे. हिडनबर्ग रिसर्च या वित्तीय संशोधन संस्थेने अदानी समूहावर केलेल्या अहवालावर चौकशी व कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवालही खासदार धानोरकर यांनी केला.

सरकारी वित्तीय संस्था व एलआयसीवर अदानीची मदत करण्यासाठी दबाव का? अदानीची एवढी मदत का करता? आयपीओला मोठा प्रतिसाद मिळून सरकारला विक्रीतून २० हजार ५५७ कोटी मिळाले, त्याचे काय केले? या सर्व घोटाळ्यांच्या चौकशीची कॉग्रेसने मागणी केली. काँग्रेसचे संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली तर जाणून बुजून संसद स्थगित करीत टाळाटाळ करणे सुरू आहे. परंतु, केंद्र सरकार का टाळाटाळ करत आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला हवी आहेत.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar News : तेव्हा बाबासाहेबांनी जातिवादाला जोरदार टक्कर दिली होती, आणि आज...

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान, अदानी समूहाकडे आलेले कोट्यवधी रुपये, काळे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे (Farmers) झालेले मृत्यू, या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने (Modi Government) देशातील जनतेला द्यावी. यासाठी काँग्रेसच्यावतीने (Congress) ‘जवाब दो मोदी’ आंदोलन आज चंद्रपुरात (Chandrapur) करण्यात आले. आंदोलनात विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ नेते के. के. सिंग, प्रवीण पडवेकर, राजेश अडूर, प्रवीण पडवेकर, प्रीती शहा, इरफान शेख, मनोज खांडेकर सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com