अमरावतीत बंदला हिंसक वळण, परिस्थिती नियंत्रणाबाहेर

काही दिवसांपुर्वी त्रिपुरा (Tripura) राज्यात पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली
अमरावतीत बंदला हिंसक वळण, परिस्थिती नियंत्रणाबाहेर

अमरावती : काही दिवसांपुर्वी त्रिपुरा (Tripura) राज्यात पानीसागर उपविभागात विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) रॅलीदरम्यान एका मशिदीची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर त्रिपुरा राज्य प्रचंड धुसमत आहे. महाराष्ट्रातही (Maharashtar) याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

राज्यात काल दिवसभरात बेळगाव, नांदेडसह अमरावती जिल्ह्यात या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी काहीवेल तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीसांनी बेळगाव आणि नांदेडमधील परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र अमरावतीत यांचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

अमरावती जिल्ह्यात काल त्रिपुरातील या घटनेविरोधात अमरावती शहरात जमात-ए-अहले सुन्नत संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी जयस्तंभ चौक, चित्रा चौक परिसरातील दुकानावर दगडफेक करून प्रचंड नुकसान केले. या संपूर्ण प्रकारामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अमरावतीत बंदला हिंसक वळण, परिस्थिती नियंत्रणाबाहेर
लोकमान्य टिळकांचं 'ते' वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडते

त्यानंतर आजही पोलीसांनी आज शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. मात्र तरीही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी शहरातील काही भागात, दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली. आंदोलकाकडून घोषणा बाजी करत ही तोडफोड करण्यात आली. जमाव वाढत पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला. मात्र आंदोलकांचा जमान मोठा असल्याने त्यांच्यापुढे पोलिसांची ताकद कमी पडल्याचे दिसत आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूरांचा इशारा

याबाबत बोलताना अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीकरांना शांततेचे आवाहन केले आहे. ''माझी सर्व आंदोलकांना विनंती आहे की, बाबानों कृपा करुन शांतता राखा. काल आणि आज घडलेली घटना निंदनीय आहे, अमरावतीला इतक्या भांडणाची, हिंसेची सवय नाही. त्रिपुरा राज्यातील एखाद्या घटनेचा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात असा परिणाम होत आहे. हा राजकीय कट असून त्यातून अमरावतीची आणि महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.

या सर्व घटनेला राजकीय वळण देण्याचा कट केला जात आहे आणि ज्याला याचा फायदा होणार आहे तोच आरोपी आहे, असा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे जे आंदोलक, समाजकंटक शहराचे नुकसान करतील त्यांना सोडणार नाही, सर्वांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही यशोमती ठाकून यांनी दिला आहे. तसेच,सध्याची परिस्थिती पाहता यशोमती ठाकूरांनी गृहमंत्र्यांकडे जास्तीच्या पोलीस फौजफाट्याची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com