लोकमान्य टिळकांचं 'ते' वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडते

''1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले,'' असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranout) केले होते.
Kangana Ranout- Sanjay Raut
Kangana Ranout- Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''1947 साली भारताला स्वातंत्र्य (Freedom) नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले,'' असे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranout) केले होते. तिच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिच्यावर टीका होत आहे. कॉंग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीसह (NCP) देशभरातील लोक तिला मिळालेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा (Treason) खटला दाखल करावा. अशी मागणी करत आहेत. त्यानंतर आज शिवसेनेनेही कंगनाच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. लोकमान्य टिळकांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेनेने कंगनावर टीका केली आहे.

'एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात.' टिळकांचं हे वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेने आपल्या केली आहे. शिवसनेनेने आजच्या दैनिक सामनच्या अग्रलेखातून कंगनावर टिकास्त्र डागले आहे. यासोबत स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा संदर्भ देत कंगनावर निशाणा साधला आहे.

Kangana Ranout- Sanjay Raut
NCB : समीर वानखेडेंनी या बॉलीवुड कलाकारांचीही केली होती चैाकशी

वाचा, काय म्हटले आहे सामनाने आजच्या अग्रलेखात -

- ''शिवसेनेने राष्ट्रवाद, हिंदुत्व गहाण ठेवल्याचे वक्तव्य भाजपवाले करीत असतात. महाराष्ट्रातील सत्ता गमावल्याचा तो जळफळाट असतो; पण त्यांच्या कंगनाबेनने तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळय़ांवरच अफू–गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे.''

- भारतीय जनता पक्षातील पुरुष महामंडळ अधूनमधून बॉम्ब फोडण्याची भाषा करीत असतात. प्रत्यक्षात बॉम्ब कधीच फुटत नाहीत; पण भाजपाच्याच कंगनाबेन रानौत यांनी एक बॉम्ब फोडला असून त्यामुळे भाजपाच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे.

- कंगनाबेन यांच्या मते देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. मोदींचे राज्य हेच स्वातंत्र्य. बाकी सगळे झूठ! कंगनाबेनचे डोके हे बधीर झाले आहे, असे वरुण गांधी म्हणतात. कोणत्या कारणामुळे ते बधीर झाले ते एनसीबीचे वानखेडेच शोधू शकतील! पण मोदी सरकारचे डोकेही त्याच कारणाने बधीर झाले नसेल तर या देशद्रोहाबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार ते परत घेतील.

-हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ाच्या क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता.कंगनाबेन यांना नुकतेच ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. यापूर्वी हा सन्मान हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या वीरांना मिळाला आहे. त्याच वीरांचा अपमान करणाऱया कंगनाबेनलाही अशा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हे देशाचे दुर्दैव आहे.

Kangana Ranout- Sanjay Raut
पुन्हा दिवाळी साजरी करण्याची सोलापूरच्या लोकप्रतिनिधींची संधी या कारणांमुळे हुकली...

-कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला. तिचे नथुरामप्रेमही उफाळून येत असते. तिच्या बरळण्याकडे एरव्ही कोणी फारसे लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सुचतात, असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान ततोतंत खरे ठरते.

-1947 साली स्वातंत्र्य मिळालेच नाही तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते.

-दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यसंग्राम झाला. हजारो नव्हे तर लाखो जणांनी त्याकामी बलिदान केले. तात्या टोपे, झाशीची राणी, वासुदेव बळवंत फडके, तीन चाफेकर बंधू, अश्फाक उलमा खाँ, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, सुखदेवांसारखे असंख्य वीर फासावर गेले.

- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून इंग्रज साम्राज्यास आव्हान दिले. अंदमान, मंडालेचे तुरुंग कांतिकारकांनी भरून गेले. ‘चले जाव’चा नारा गांधीजींनी देताच मुंबईतील गिरणी कामगार रस्त्यावर उतरला व इंग्रजांना पळताभुई थोडी झाली. जालियनवाला बागसारखे हत्याकांड ब्रिटिशांनी घडवून स्वातंत्र्ययोद्धय़ांच्या रक्ताने न्हाऊन काढले.

- रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला ‘भीक’ असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस ‘पद्मश्री’ पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळय़ास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भिकेची उपमा देणाऱया कंगनाबेनचे डोळे भरून कौतुक करतात. स्वातंत्र्य व क्रांतिकारकांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर या राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com