Banner Politics: ‘आम्हाला मत मागायला येऊ नका..!’ अकोल्यात आगळीवेगळी बॅनरबाजी

Voters Upset : नाराज महिलांनी छायाचित्रांसह व्यक्त केला विरोध
Banners in Akola
Banners in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola News : ‘आम्ही भाजपचे मतदार आहोत, मात्र भाजपच्या कोणत्याही नेत्याने आमच्या एरियात मत मागायला येऊ नये’, अशा आशयाच्या बॅनरची सध्या अकोल्यात चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. अकोल्यात लागलेल्या या अनोख्या बॅनरच्या माध्यमातून नागरिकांनी रोष व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

2024 निवडणुकीचे वर्ष असणार आहे. या वर्षात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक पार पडणार आहेत. अवघ्या काही दिवसांनंतर लोकसभेचा रणसंग्राम होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात कोणती कामे केली, कोणत्या योजना राबविल्या हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Banners in Akola
Akola BJP Politics : ‘गाव चलो अभियान’ राबवित काय साध्य होणार?

अशात मतदारांनीही आता सत्ताधारी आणि विरोधकांना विविध माध्यमातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशाच एका बॅनरची चर्चा सध्या अकोला शहरात होत आहे. हे बॅनर लागले आहे अकोला शहरातील गोरक्षण रोडवरील सहकार नगर रोड परिसरात. या अनोख्या बॅनरवर थेट भाजपच्या लोकप्रतिनिधींवरच ताशेरे ओढले आहेत. ‘आता आम्हाला मत मागायला येऊ नये’, असेही या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे बॅनर लावून विरोध व्यक्त केल्याने सध्या यावर अकोल्यात चर्चा सुरू आहे.

परिसरातील महिलांचे फोटो असलेल्या या बॅनरवर आहेत ‘अकोल्यात 30 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. आम्ही भाजपचे मतदार आहोत. भाजपचे खासदार, आमदार आणि नगरसेवक आहेत. मात्र गेल्या 30 वर्षांपासून आम्हाला सर्व्हिस लाइन नाही. रस्ता नाही, त्यामुळे कोणत्याही भाजपच्या नेत्याने मतदान मागण्यास आमच्या एरियात येऊ नये’, असे या बॅनरवर म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘बस करा विकास!’ असा टोलाही बॅनरच्या माध्यमातून भाजपच्या लोकप्रतिनिधींना लगावण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांना मतदारांच्या रोषाचा सामना करण्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. अनेक वेळा नेत्यांना विकासाच्या मुद्द्यावरून गावबंदी, परिसर बंदी, विरोधात बॅनरबाजी असे प्रकार नवीन नाहीत. दुसरीकडे सोशल मीडियातूनही सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधींना अशा प्रकारांचा मोठा सामना करावा लागतो. मात्र बॅनरच्या माध्यमातून अकोल्यात प्रथमच नागरिकांनी अशी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

लोकशाही शेवटी मतदार राजा असतो. मतदार कुणाला सत्तेच्या खुर्चीवर बसवतो तर कुणाला सत्तेवरून खालीही खेचतो. त्यामुळे बॅनरच्या माध्यमातून अकोल्यात व्यक्त झालेली ही नाराजी भाजपला परवडणारी दिसत नाही. निवडणुकीत एक मतही निर्णायक ठरते. अशात मतदारांना अकोल्यातील भाजपने केवळ गृहित धरणे सोडावे व मतदारांना योग्य वागणूक द्यावी, असाच या बॅनरचा अर्थ लावला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Banners in Akola
Akola Vanchit News : महाविकास आघाडीत येऊन 'वंचित'ला मिळणार का बालेकिल्ला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com