Akola BJP Politics : ‘गाव चलो अभियान’ राबवित काय साध्य होणार?

Lok Sabha Election 2024 : उमेदवार घोषित नाही मात्र प्रचारात आघाडी
Akola Lok Sabha Election 2024.
Akola Lok Sabha Election 2024.Sarkarnama
Published on
Updated on

Akola BJP : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम आटोपल्यानंतर आता भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुन्हा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत आता भाजपचे 'गाव चलो अभियान' चालणार आहे. अकोला जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मतदारांचा टक्का भाजपच्या बाजूने वाढविण्यासाठी हे अभियान भाजप राबविण्यात येत आहे. मात्र या अभियानाचा भाजपला किती फायदा होतो हे पाहावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्यासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र अकोला येथे या सर्वांत सध्यातरी भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे अभियान राबविण्याचा धडाका भाजपकडून सुरू करण्यात आला आहे. आता ग्रामीण भागातील मतदारदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने 'गाव चलो अभियान' हाती घेतले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता भाजपकडून पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीवर ‘फोकस‘ करीत एका नव्या अभियानाची सुरुवात होणार आहे.

Akola Lok Sabha Election 2024.
Akola Lok Sabha Constituency : वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ अनुप धोत्रेंना मिळणार?

जवळपास पंधरा पक्षांना घेऊन महायुतीच्या माध्यमातून राज्यात लोकसभा निवडणूक लढविण्यात येणार आहे. अद्यापही लोकसभा निवडणुकीचा उमेदवारही ठरले नाहीत मात्र भाजपकडून लोकसभेचा प्रचार जोरात सुरू आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' म्हणत विविध अभियानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी सरकारने राबविलेल्या प्रमुख योजना व भाजपाच्या कामाची माहिती असलेले पत्रक वितरित करत मतदारांना भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून असणार आहे.

अकोला जिल्ह्यात अद्यापही भाजपकडून उमेदवारी कुणाला मिळणार हे स्पष्ट नाही. मात्र प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे. राज्यातील भाजपकडून येणारे प्रत्येक अभियान जिल्ह्यात आक्रमकपणे राबविण्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा जोर आहे. उमेदवारीसाठी अनेकांच्या नावाची चर्चा आहे. मात्र नेमका उमेदवार कोण असेल, हे गुलदस्त्यात आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे हे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट आहे. दुसरीकडे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून होते आहे. प्रत्येक अभियानात अनुप धोत्रे यांना भाजपकडून पुढे करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गाव चलो अभियानअंतर्गत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोधी पक्षातील नेते व पदाधिकार्‍यांची भेट घेतली जाणार असून स्थानिक स्तरावरही त्यांचे पक्षप्रवेश व्हावेत, असा प्रयत्न असणार आहे. मात्र यामध्ये किती यश मिळते हे पाहावे लागणार आहे. एकमात्र निश्चित भाजप लोकसभा निवडणूकीत जिंकण्यासाठी मोठा आटापिटा करीत असल्याचे विविध अभियानांवरून समोर येत आहे. मात्र आता 4 फेब्रुवारीपासून सुरू होणारे भाजपचे गाव चलो अभियान किती यशस्वी होते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Akola Lok Sabha Election 2024.
Akola Vanchit News : महाविकास आघाडीत येऊन 'वंचित'ला मिळणार का बालेकिल्ला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com