अन् बावनकुळे झाले भावुक, हजारोंनी अनुभवला फडणवीसांसोबतचा स्नेहबंध...

त्यांनी (Chandrashekhar Bawankule) फडणवीसांना जोरदार मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी फडणवीसांचे (Devendra Fadanvis) डोळेही डबडबले होते.
Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis

Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis

Sarkarnama

Published on
Updated on

नागपूर : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमांशी बोलून बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) स्वागत लॉनमध्ये गेले. लगेच तेथे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. त्यांना भेटण्यासाठी बावनकुळे लॉनच्या प्रवेशद्वारावर आले. तेथे त्यांनी फडणवीसांना जोरदार मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी फडणवीसांचे (Devendra Fadanvis) डोळेही डबडबले होते. तेथे उपस्थित हजारोंच्या गर्दीने हा भावून स्नेहबंध अनुभवला आणि डोळ्यांत साठवून ठेवला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळेंनी उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हा आता बावनकुळे संपले, अशा चर्चांनी जोर धरला होता. पण बावनकुळेंनी त्याही परिस्थितीत हार मानली नाही आणि पक्षही सोडला नाही. राज्यभर फिरून ते पक्षसंघटनेचे कार्य करीत राहिले. दोन वर्षानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि आज लागलेल्या निकालात त्यांनी दणदणीत विजय मिळविला. बावनकुळेंचा विजय म्हणजे येणाऱ्या काळात सर्व निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची नांदी आहे, असे फडणवीस म्हणाले.

नेव्हर गो बॅक वाला कम बॅक..

या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. माझ्या विजयावेळी झालेल्या आनंदापेक्षा जास्त आनंद आज झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. बावनकुळे यांचा हा नेव्हर गो बॅक वाला कम बॅक आहे. तीन पक्ष एकत्र आल्यावर आपल्याला कुणी पराभूत करू शकत नाही, असा विरोधकांचा समज आज पार मोडीत निघाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Chandrashekhar Bawankule and Devendra Fadanvis</p></div>
बावनकुळे जिंकले अन् दरेकर म्हणाले,..

दरम्यान, नागपूरमध्ये पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जबाबदार असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे. नाना पटोले यांनी मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार बदलवून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा घोषित केला. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार सदस्य संभ्रमित झाले आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com