बावनकुळे जिंकले अन् दरेकर म्हणाले,..

नागपूर आणि अकोला येथील विधानपरिषदेच्या जागेवर भाजप उमेदवारांचा विजय झाला आहे.
praveen darekar
praveen darekarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : नागपूर आणि अकोला विधानपरिषदेच्या जागेचे निवडणूक निकाल आज (ता.14 डिसेंबर) समोर आले असून राज्यातील विरोधीपक्ष असलेल्या भाजपने (BJP) या दोन्ही जागी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) हा मोठा धक्का मानला जात आहे. सत्ताधारी पक्षांचे उमेदवार पडल्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे असून हा पराभव सत्ताधीरी पक्षांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निकालांवरून भाजप नेते व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सत्ताधारी शिवसेना (Shivsena)नाना पटोलेंवर (Nana Patole) जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

praveen darekar
फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; बावनकुळेंच्या विजयानंतर म्हणाले...

भाजपला नागपूर आणि अकोल्यात चांगले यश मिळाल्यानंतर भाजपनेत्यांनी आनंद व्यक्त करत सत्तेतील काँग्रेस व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोल्यात गोपीकिसन बाजोरीया यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अकोल्यात आपली जागा शिवसेनेला राखता आली नाही व आपल्या उमेदवारास पराभव पत्कारावा लागला, अशी टीका दरेकारांनी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

praveen darekar
काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना मिळाले केवळ स्वतःचे मत

दरेकर म्हणाले, विदर्भात भाजपला चांगला जनाधार असून विदर्भ भाजपसोबत राहिला. काँग्रेसची मते फुटली असून नाना पटोलेंची एकाधिकारशाही यावेळी दिसली. या सरकारमध्ये विसंवाद असल्याचे हे यानिमित्ताने दिसून आले. तर, राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना अकोल्यातील जागा शिवसेनेला टिकवता आली नाही. शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेनेच्या हातून गेला. शिवसेनेला फसवण्याचे काम महाविकास आघाडीने केले आहे. शिवसेनेला उघड्यावर पाडल्याचे यावरून दिसते आहे. या तिन्ही पक्षात आलबेल नाही. काँग्रेस पक्षाचा उमेदवार असताना यांना ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला. केवळ तीन पक्षात विसंवाद नाही तर, यांच्या पक्षापक्षात विसंवाद आहे, असा खोचक टोला दरेकरांनी लगावला.

praveen darekar
भाजपकडून आघाडीला धक्का; खंडेलवाल यांची बाजोरियांवर मात

दरम्यान, या विजयानंतर फडणवीस म्हणाले की, मला माझ्या विजयावेळी झालेल्या आनंदापेक्षा जास्त आनंद आज झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा आजचा विजय म्हणजे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची नांदी आहे. बावनकुळे यांचा हा नेव्हर गो बॅक वाला कम बॅक आहे. तीन पक्ष एकत्र आल्यावर आपल्याला कुणी पराभूत करू शकत नाही, असे फडणवीसांनी म्हटले.

पराभवावर पटोले म्हणाले..

या पराभवानंतर माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, नागपूरच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला. मतदारांना भाजपने बाहेर यात्रेवर नेले. आपल्याच मतदारांवर विश्वास नसलेला हा पक्ष आहे. यापध्दतीचा घोडेबाजार लोकशाहीला धोकादायक आहे. पण तरीही या निकालाचं स्वागत करायला हवे, असे पटोले म्हणाले. त्याचप्रमाणे उमेदवार बदलल्याचा परिणाम निवडणुकीवर झाला नाही, ती आमची स्ट्रॅटेजी होती, असेही पटोलेंनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com