बावनकुळे म्हणाले, सीताराम कुंटे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वास्तव समोर आले...

या प्रकरणाची माहिती त्यांना असूनही मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) त्याची दखल घेतली नाही, असेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : राज्याच्या गृह खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात झालेल्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीसमोर (ED) केलेल्या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाचे वास्तव समोर आले आहे. कुंटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच हा गौप्यस्फोट केला असावा, असे मत आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार कुंटे यांना तशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून असाव्यात, असे सांगताना आमदार बावनकुळे म्हणाले, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्याखालील बदल्या पोलिस महासंचालक व अन्य समितीला आहेत. पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्यांना करावयाच्या बदल्या कागदावर लिहून यादी करून संबंधितांकडे दिल्या. कोणत्या पदावर, कोणत्या गावाला, कोणता अधिकारी, हे सर्व कागदावर लिहून दिले. हे होत असताना मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांना माहीत नाही असे म्हणता येत नाही. मुख्य सचिव म्हणून नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून त्यांनी ही माहिती सक्तवसुली संचालनालयासमोर सांगितली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व माहीत असताना वस्तुस्थिती सर्वांसमोर आणायला हवी होती. पण या प्रकरणाची माहिती त्यांना असूनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही..

खासदार संजय राऊत यांना वाईनची किराणा दुकानात विक्रीला परवानगी या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगताना आमदार बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाच्या काळात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन दारू विक्रीला परवानगी नाकारली होती. मी त्यावेळी उत्पादन शुल्क मंत्री होतो. मी पण तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यावेळी शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी ऑनलाइन दारूविक्रीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी माझ्याकडे आले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या आजच्या भूमिकेला काही अर्थ उरत नाही.

Chandrashekhar Bawankule
Video: नानांना पागलखान्यात भरती करा,सोनिया गांधींना पाठवणार पत्र,चंद्रशेखर बावनकुळे

स्वस्त प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलत असतात..

वाईन म्हणजे दारू नाही, याची माहिती अजित पवारांनाच माहीत. पण त्यांना हे बोलणे शोभत नाही. बेजबाबदार वक्तव्य पवारांनी करू नये. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुण्या एकाला फायदा पोचवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, हे आम्ही नंतर स्पष्ट करूच. पण सध्या तरी शेतकऱ्यांची व जनतेची दिशाभूल केली जात आहे, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com