Bawankule News : `एकेरी'वरून बावनकुळे भडकले; म्हणाले, मोदी नावाच्या वादळात ठाकरे उडून जातील !

Narendra Modi : मोदी नावाच्या वादळाला ठाकरे घाबरले आहेत,
Chandrashekhar Bawankule, Narendra Modi and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule, Narendra Modi and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule Spoke in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उंची किती आणि तुमची उंची किती, असा सवाल उद्धव ठाकरे यांना करत मोदी नावाच्या वादळाला ठाकरे घाबरले आहेत, अशी टिका करून मोदींचे वादळ महाराष्ट्रात येईल, तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील, अशी घणाघाती टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. (Uddhav Thackeray will fly away)

बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदींचा वारंवार एकेरी उल्लेख त्यांनी टाळायला हवा होता. पुन्हा पुन्हा ते जाणीवपूर्वक चुका करत आहेत. कधी ना कधी याचा स्फोट होईल. नागपूरनजीकच्या कोराडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत टीका करून नेतृत्वाचा अपमान करू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दुसऱ्यांना संस्कार शिकवता, मग स्वतःच का विसरता.

पंतप्रधान मोदींचे नेतृत्व जगातील १५० देशांनी मान्य केले आहे. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. २०१४ व २०१९ मध्ये ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे आमदार-खासदार निवडून आणले आणि आज त्यांच्यावर एकेरी टीका करून बेईमानी करत आहात. कितीही मशाली लावा, मोदींच्या वादळात त्या विझणारच, असा दावाही आमदार बावनकुळे यांनी केला.

या अवस्थेला उद्धव ठाकरेच जबाबदार..

देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर भावासारखे प्रेम केले. एकवेळ भाजपचे काम केले नाही मात्र उद्धव ठाकरेंचे काम केले. तुमच्या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात. एकवेळ अशी होती की, मोदी देशातले सर्वोत्तम नेते कसे आहेत, याबाबत मंचावरून उद्धव ठाकरे भरभरून बोल होते आणि आता केवळ टिका करण्यात गुंतले आहेत.

Chandrashekhar Bawankule, Narendra Modi and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule News : आशिष देशमुख यांच्या भेटीबाबत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं !

उद्धव ठाकरे यांना पाकिस्तानी जनतेला प्रमाणपत्र मागावे लागतेय. यापेक्षा अधिक दुर्दैव कोणते? ठाकरेंचा भारतीय लोकांवर विश्वास राहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं, याचं प्रमाणपत्र देश आणि महाराष्ट्राने दिले आहे. रोज त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात, पाकिस्तानी लोकांना माहीत आहे शिवसेना कुणाची? हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान नव्हे का, असा सवालही आमदार बावनकुळे यांनी केला.

ठाकरेंनी भाजपसोबत बेईमानी केली ती लोकांना आवडलेली नाही. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागत आहेत. वेगवेगळ्या सभा घेत आहेत. त्यामुळे यांनी निवडणुका एकत्र लढू की लढू नये, यावर खुद्द शरद पवार यांनी भाष्य केले आहे. आंबेडकर यांचा पक्ष सोबत लढेल की नाही, माहिती नाही. पण महाविकास आघाडी किती पुढे जाईल, याबाबतची शंकाच आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule, Narendra Modi and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule News: पण एकनाथ शिंदेंना तर मी नेहमी हसतानाच बघतोय..!

यापूर्वी असा समन्वय बघितला नाही..

२७ एप्रिलला अमित शाह (Amit Shaha) नागपूरला (Nagpur) येत आहेत. नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी ते येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचाही दौरा लवकर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वय चांगला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये असा समन्वय बघायला मिळालेला नाही, असेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com