बावनकुळे म्हणाले, महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ...

सुरक्षा रक्षकानेही अधिकाऱ्यांना असे काही घडू शकते, असे सांगितले होते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही घटना घडल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना सांगितले.
Chandrashekhar Bawankule with Mohan Makde and officers
Chandrashekhar Bawankule with Mohan Makde and officersSarkarnama

नागपूर : कोराडी वीज केंद्राचा राख साठवून ठेवण्यासाठी बांधलेला बंधारा काल सकाळी १० वाजता फुटला. त्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी वाहू लागले. जीवित हानी झाली नसली तरी शेतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील गावांच्या सरपंचांनी पूर्वकल्पना संबंधितांना दिली होती. आदल्या रात्री सुरक्षा रक्षकानेही अधिकाऱ्यांना असे काही घडू शकते, असे सांगितले होते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही घटना घडल्याचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीमध्ये हा विषय ठेवण्यात येईल. तोपर्यंत अधिकारी आपले सर्वेक्षण पूर्ण करतील. ही व्यवस्था महानेजकोला उभी करावी लागणार आहे. कारण यामध्ये महसूल विभाग मदत देणार नाही. ही जबाबदारी महाजनेकोची आहे. त्यामुळे हे नुकसान महाजनेकोकडूनच वसूल करू आणि शेतकऱ्यांना द्यायला लाऊ, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. यावेळी तलावाच्या भिंतीवर जिल्हाधिकारी (Collector) आर. विमला, जिल्हा परिषद (ZP) सदस्य मोहन माकडे, जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, खैरीचे सरपंच बंडू कापसे, कवठाचे सरपंच लक्ष्मण सिरसाम, खसाळाचे सरपंच रवी पारधी घटनास्थळी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची बनवाबनवी..

राख तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे पाण्याचा नाल्याद्वारे विसर्ग होत असल्याची बनवाबनवी सुरुवातीला कोराडी वीज केंद्रामार्फत करण्यात आली. वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तातडीने राख तलाव स्थळी पोहोचले. मात्र, राख बंधाऱ्यातून सकाळी १० वाजेपासून पाण्याचा विसर्ग वाढतच होता. याला नैसर्गिक आपत्ती भासवून संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा तातडीने देण्यात आला. मात्र, तलावाचा बांध फुटल्याचे लक्षात येताच अधिकाऱ्यांची बनवाबनवी उघडकीस आली.

राख मिश्रित पाण्याचा आरोग्य, पर्यावरणावर परिणाम..

कोराडी वीज प्रकल्पाजवळील खसाळा राख बंधारा फुटल्याने लाखो टन राख वाहून गेली. यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. ही राख जवळच्या कन्हान नदीतून वाहून जाईल. यामुळे शहराला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. राखेमुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. खसाळा येथील शेती व वस्ती पाण्याखाली गेली आहे. राख वाहून गेल्याने नदी, नाले व नळयोजनेवर होणार आहे. शेकडो एकरमध्ये ही राख ठेवण्यात आली होती.

Chandrashekhar Bawankule with Mohan Makde and officers
बावनकुळे म्हणाले, महाविकासच्या काळातील प्रभाग रचना रद्द करा !

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा : राष्ट्रवादी काँग्रेस

कोराडी वीज प्रकल्पाजवळील खसाळा राख तलावाचा बांध फुटल्याने राख वाहून गेली आहे. यामुळे आजूबाजूच्या गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी या भागातील सर्व गावांना तत्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा महानिर्मितीने स्वतः युद्ध स्तरावर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंद्रशेखर यांनी केली आहे.

पाच गावांत पाणी शिरले;जीवित हानी नाही : जिल्हाधिकारी

अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा अॅशपॉड फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत पाणी शिरले. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून सायंकाळपर्यंत पुराचे पाणी ओसरले आहे. परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. जिल्हा प्रशासनाव्दारे त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण करण्यात आले आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या तसेच नागरिकांना आवश्यक मदत पुरविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या. गावात पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले असल्यास तातडीने सर्वेक्षण करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com