Bawankule : बावनकुळे म्हणाले, ठाकरे सरकारने 'वेदांता'ला जागाच दिली नव्हती...

त्यांनी तात्काळ आंदोलन बंद करून महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
Chandrasshekhar Bawankule
Chandrasshekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : वेंदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गेल्याचा अपप्रचार सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मविआ सरकारने वेदांता प्रकल्पासाठी करार केला नव्हता, ना औद्योगिक महामंडळाची जागा दिली होती. त्याचा पुरावाच समोर आला आहे. त्यामुळे जे लोक प्रकल्प गेला म्हणून खोटारेड आंदोलन करीत आहेत, त्यांनी तात्काळ आंदोलन बंद करून महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ असेही ते म्हणाले. नागपूर (Nagpur) येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

वेदांता प्रकल्प गेल्याचा उहापोह मविआमधील पक्ष व नेते करीत आहेत. प्रत्यक्षात मविआ सरकारने (Mahavikas Aghadi Government) या प्रकल्पासाठी काहीच केले नाही. करार केलाच नाहीच शिवाय जागाही दिली नाही. याबाबत महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या पुणे कार्यालयानेच पत्राद्वारे माहिती दिल्याचे सांगून त्यांनी पत्राची प्रत दाखविली.

श्री बावनकुळे म्हणाले, आंदोलन करणारे खोटारडे आहेत, जनता त्यांना माफ करणार नाही. सत्ता गेल्यामुळे ते आंदोलन करण्यासारख्या बदमाशा करीत आहेत. खोटे आंदोलन व ईव्हेंट मॅनेजमेंट करून महाराष्ट्राची दिशाभूल करीत आहेत. वेदांता प्रकल्प मविआमुळेच गेला हे उघड झाल्याने त्यांचा खोटारडेपणा समोर आला. आता त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी व आंदोलने बंद करावी अन्यथा त्यांच्या आंदोलनाला जशाच तसे उत्तर देऊ, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

पीएफआय कार्यकर्त्यांवर कारवाई करा..

देश विरोधी कार्यवाही करणारी पीएफआय या संघटेनेवर केंद्र सरकारने कारवाई केली असून राज्य सरकारही कारवाई करीत असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनेच्या सदस्यांना जिथे असतील तेथून शोधून व झोडून काढावे. त्यासाठी कोणताही विलंब लावू नये. ज्या ठिकाणी अशा संस्था असतील त्या बंद कराव्या. अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील, असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrasshekhar Bawankule
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

नुकसान भरपाई दिली..

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने पूर्व विदर्भासाठी ११८१ कोटी रुपये दिले आहेत. यापूर्वी एवढी नुकसान भरपाई कधीही मिळाली नाही. सरकारने दाखविलेल्या तत्परतेसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. लवकरच शेतकऱ्यांना रोख मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मविआ हा तीन चाकाचा आटो तर शिंदे-फडणवीस सरकार विकासाची बुलेट ट्रेन असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com