भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

मी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची वाढ कशी होईल, एवढीच माझी कामाची जबाबदारी आहे.
Raj Thackeray-Chandrashekhar Bawankule
Raj Thackeray-Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns)-भारतीय जनता पक्षाच्या (bjp) युतीच्या (Alliance) संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा असतो, तो आमचे वरिष्ठ नेते अमित शहा, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस हे घेत असतात. मी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची वाढ कशी होईल, एवढीच माझी कामाची जबाबदारी आहे. बाकी युतीसंदर्भातील निर्णय आमचे वरिष्ठ नेते ठरवतात, असे मनसे-भाजप युतीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule said about BJP-MNS alliance...)

आमदार बावनकुळे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले की, मी केवळ राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. आगामी काळात गणेशोत्सव असून त्याच्याही शुभेच्छा दिल्या. या भेटीमागे काही राजकीय हेतू नाही. राज ठाकरे हे आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. आमच्या पारिवारीक कार्यक्रमात ते नेहमीच हजर राहिले आहेत. ते नेहमीच वैचारिक पद्धतीने बोलतात. तसेच, भाजप आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक साम्य आहे. मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सर्वच नेत्यांना भेटतो आहे, त्यामुळे या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Raj Thackeray-Chandrashekhar Bawankule
शिंदे-फडणवीसांना कोर्टाचा दणका; जळगाव जिल्हा दूध संघावरील प्रशासक नियुक्ती अवैध

भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी वाढत आहेत, त्यामुळे वैचारिक युती होणार आहे का, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे हे नेहमीच हिंदुत्वाची बाजू मांडत आलेले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करत आलेले आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही. त्यामागे कोणताही राजकीय अर्थ नाही. हिंदुत्व आणि महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी जे नेतृत्व राज्यात असेल, त्यांना भेटायला काही अडचण नाही.

Raj Thackeray-Chandrashekhar Bawankule
चंद्रकांत खैरे राहतात औरंगाबादला आणि गोळ्या मारतात ढगात : शहाजी पाटलांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नेहमीच लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. या वेळी ते गणपतीच्या दर्शनासाठीच येत असावेत, असे मला वाटते. त्यांचा अधिकृत दौरा अद्याप आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com