Bawankule vs Thackeray : बावनकुळे भडकले; म्हणाले, ‘ईट का जबाब पत्थर से’ देणार !

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे तुमचे मानसिक संतुलन बिघडले.
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘ईट का जवाब पत्थर से’ देणार असल्याचा घणाघाती इशारा दिला आहे. (We will not spare you if you talk about Fadnavis)

आज (ता. ११) नागपुरात पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे तुमचे मानसिक संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात कोराडी रोडवर मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.

आता रस्त्यावर आंदोलन केले, पुढच्या आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना इशारा दिला. देवेंद्र फडणवीस कर्तृत्वाचे धनी आहेत. तर, उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे, असे सांगत यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल, असे बावनकुळे म्हणाले.

पत्रकार परिषदेला नागपूर भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, नागपूर पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, सुनील कोढे, जयप्रकाश गुप्ता, विष्णू चांगदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule यांनी ठाकरेंचे वयचं काढले । Devendra Fadnavis । Uddhav Thackeray।Sarkarnama

उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी, असा सुरू झाला. वयाच्या ६०व्या वर्षी मी मुख्यमंत्री, माझा मुलगा, मंत्री, असा त्यांचा प्रवास आहे. तेच कलंक आहेत, असे सांगून बावनकुळे म्हणाले की, ठाकरेंनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले, अशी कितीतरी कलंकित कामे त्यांनी केली असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

संभाजीनगर, धाराशीव, अहिल्यादेवीनगर अशी नावे देऊन अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचाविणारे देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही अशांची साथ देणारे कलंकित व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीर सावकारांचा अपमान कॉंग्रेस करीत असताना त्यांचा विचार, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे व पुढच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस काम करणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Ambadas Danve On Bawankule News : देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करायला ते कोण होते ?

स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कलंकित करंटे आहेत. नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्याच्या प्रेमात पडलेल्या लोकांना तुरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आहे. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com