Bazar Samiti Result : अकोल्यातील 'वंचित'च्या वर्चस्वाला सुरूंग, उमेदवारांची दाणादाण; सहकार पॅनेलचे निर्विवाद यश!

Bazar Samiti Result : वंचितची उडाली दाणादाण, राष्ट्रवादीचा वरचष्मा..
Akola Bazar Samit Result
Akola Bazar Samit Result Sarkarnama

Akola Bazar Samit Result : अकोला जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झालेत. त्यापैकी जिल्ह्यतील सर्वात मोठी बाजार समिती (Bazar Samiti) असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार पॅनलने सर्व १८ जागा मिळवून गड राखला आहे.

Akola Bazar Samit Result
Akluj Bazar Samiti Result : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या मातोश्रींचा दोन्ही गटात धक्कादायक पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील या पॅनलमध्ये शिवसेना (ठाकरे गट), भाजपचा सहभाग होता. सहकार क्षेत्रात पक्ष म्हणून पाऊल ठेवताना वंचित बहुजन आघाडीला अपयशयाचा सामना करावा लागला. अकोला बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरिष धोत्रे यांच्या सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. त्यांच्यासोबत भाजप व शिवसेनेच्या सदस्यांचाही या पॅनलमध्ये सहभाग होता.

वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत सरपंच संघटना शिव शेतकरी पॅनल स्थापन केले. दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार झाला. मात्र, भिस्त असलेल्या ग्रामपंचायत मतदासरसंघातही वंचितला यश मिळू शकले नाही. सहकार पॅनलने सर्व १८ जागांवर बाजी मारली.

राष्ट्रवादीचा वरचष्मा :

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. सहकार पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडीत असलेले ११ संचालक विजयी झालेत. त्यात स्वतः पॅनलेचे नेतृत्व करणारे शिरिष धोत्रे यांचाही समावेश आहे. याच पॅनलमधील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे पाच, शिवसेनेचे (ठाकरे गट) दाेन उमेदवारी विजयी झालेत. शिवसेनेचे दोन्ही विजयी उमेदवार हे उपजिल्हा प्रमुख पदावर आहेत.

Akola Bazar Samit Result
Akot Bazar Samit Result : प्रस्थापितांचे वर्चस्व मोडून काढत, सहकार पॅनेलच्या १५ उमेदवारांचा विजय!

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार -

- सेवा सहकारी संस्था सवर्ससाधारण मतदारसंघ :

शिरीष धाेत्रे (मते ७११), ज्ञानेश्वर महल्ले (६७५), अभिमन्यू वक्टे (६७५), सचिन वाकाेडे (६७४), रामेश्वर वाघमारे (६६४) राजेश बेले (६६७) आणि भरत काळमेघ (६८६).

- महिला मतदारसंघ :

शालूताई चतरकर (मते ७१६ ) आणि माधुरी परनाटे (६९४).

- इतर मागावर्गीय मतदासरंघ :

मुकेश मुरुमकार ७१८.

- ग्रामपंचायत मतदारसंघ :

शिवसेनेचे विकास पागृत (४३१) आणि भाजपचे वैभव माहाेरे (४०२).

- आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ :

संजय गावंडे (४१४).

-अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ :

दिनकर वाघ (४३४).

- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमातीमधून :

दिनकर नागे (७०८).

- व्यापारी-अडते मतदारसंघ :

चंद्रशेखर खेडकर (१२६) आणि राजीव शर्मा (१६७)

- हमाल-मापारी मतदारसंघ :

चंदू चाैधरी (२२२).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com