Akluj Bazar Samiti Result : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या मातोश्रींचा दोन्ही गटात धक्कादायक पराभव

Akluj Bazar Samiti : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलचा 18 पैकी 17 जागांवर विजय झाला.
Padmajadevi Pratapsingh Mohite Patil
Padmajadevi Pratapsingh Mohite PatilSarkarnama

Akluj Bazar Samiti News : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पॅनेलचा 18 पैकी 17 जागांवर विजय झाला. मात्र, विरोधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते उत्तम जानकर हे विजयी झाले.

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी माळशिरस तालुका शेतकरी विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे नेतृत्व मार्केट कमिटीचे माजी सभापती फत्तेसिंग माने पाटील, काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे सोपवले होते. या आघाडीच्या वतीने डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील या स्वतः ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून आणि सहकारी संस्था म्हणजे सोसायटी मतदारसंघातून निवडणुकीस उभा होत्या.

Padmajadevi Pratapsingh Mohite Patil
Bazar Samiti Result : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात ७५ वर्षांत प्रथमच विरोधकाचा प्रवेश : सत्ता कायम मात्र उत्तम जानकर विजयी

मात्र, सत्ताधाऱ्यांच्या एकीमुळे त्यांचा दोन्ही मतदारसंघात मोठ्या फरकाने पराभव झाला. सहकारी संस्थांमध्ये 326 मते विरोधी उमेदवारापेक्षा त्यांना कमी मिळालेली. आणि ग्रामपंचायत मतदार संघात 87 मते त्यांना कमी मिळालेली.

माजी मंत्री. कै. प्रतापसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू होते. त्यांच्या करिश्मामुळे विरोधी गटातून पद्मजादेवी मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोघे तरी नक्कीच विजय होतील असे अनेकांनी गृहीत धरले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी क्रॉस वोटिंग न होण्याची दक्षता घेतल्यामुळे श्रीमती पद्मजादेवी मोहिते पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.

Padmajadevi Pratapsingh Mohite Patil
Murbad Bazar Samiti News : ठाण्यात शिंदे शिवसेनेचा भाजपला दणका; मुरबाड बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व

मार्केट कमिटीच्या निवडणुकीत सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाविरुद्ध माळशिरस तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जुन्या भाजपमधील मातब्बर मंडळी एकत्रित आल्यामुळे भविष्यातील राजकारण कोणत्या वळणावर जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com