BJP Politics : 'सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत..., मंत्री बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ; आगामी निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपचा नवा डाव?

Chandrashekhar Bawankule Warning WhatsApp Surveillance : 'भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण तमाशा करतो. पण एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही.'
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 24 Oct : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांना बंडखोरी करू नका, असा इशारावजा सज्जड दम भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

याचवेळी त्यांनी भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं असून भाजपकडून खरंच कार्यकर्ते आणि नेत्यांवर वॉच ठेवला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मागील काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिकच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, कुठे युती होणार आणि कुठे स्वबळावर निवडणुका लढवल्या जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या निवडणुकांसाठी अनेकजण इच्छुक आहेत आणि या इच्छुकांना तिकीट न भेटल्यास ते बंडखोरी करू शकतात.

Chandrashekhar Bawankule
Sangli Politics : पडळकरांनी धुराडं पेटू देणार नाही, असा इशारा दिलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं नाव रात्रीत बदललं; नवा वाद पेटण्याची शक्यता

मात्र, आता भाजपच्या याच इच्छुकांना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी इशारा दिला आहे. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, 'भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील. आवेशात, तिकीट न मिळाल्याच्या रागात आपण तमाशा करतो.

पण एक चुकीची बंडखोरी पक्षाला नुकसानकारक ठरेल. एक नगरपालिका कमी झाली तर काही फरक पडणार नाही. पक्षात कुणी बंडखोरी केल्यास त्याचा फटका पक्षाला बसतो. एक चुकीचं बटन दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल. त्यामुळं चुकीचं बटन दाबून भंडाऱ्याचा सत्यानाश करू नका.

Chandrashekhar Bawankule
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय, 'त्या' संस्थांना नोंदणी अनिवार्य, एसओपी तयार!

आता भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे.', असं ते म्हणाले. मात्र, यावेळी त्यांनी बोलण्याच्या ओघात सर्व मोबाईल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले आहेत असं वक्तव्य केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं असून भाजपकडून सर्वांवर बारीक वॉच ठेवला जात असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com