Bhandara-Gondia News : ‘भावी खासदार’च्या बॅनरबाजीमुळे बदलली लोकसभा निवडणुकीची गणिते !

Sevak Waghaye : समर्थकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख केलेले बॅनर लावले.
Bhandara-Gondia Sevak Waghaye
Bhandara-Gondia Sevak WaghayeSarkarnama
Published on
Updated on

Congress was claiming Bhandara Lok Sabha constituency : साकोली विधानसभेचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 'भावी खासदार' असा उल्लेख केलेले बॅनर लावले. 'भावी खासदार सेवकभाऊ वाघाये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे म्हणत, साकोली विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात बॅनरबाजी करण्यात आली. (Banners were thrown in the district including Sakoli Assembly Constituency)

राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेल्या भंडारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करत खासदारकीची तिकीट माजी आमदार वाघाये यांना देत तर नाही ना, अशी संभ्रमावस्था भावी खासदार या बॅनरबाजीमुळे लोकसभा क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाघाये यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारर्कीदीला सुरुवात करणारे आणि साकोली विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून नेतृत्व केलेले माजी आमदार सेवक वाघाये आहेत. वाघाये यांना भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विश्वजित कदम यांनी त्यांच्या केसलवाडा/वाघ येथील घरी झालेल्या भेटीत जानेवारी - २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक काळात काँग्रेसचा दुपट्टा घालून काँग्रेसमध्ये प्रवेश करवून घेतला होता.

१९६२ साली अस्तित्वात आलेल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून १९९९ व २००४ मध्ये काँग्रेसकडून आमदार झालेले सेवक वाघाये तालुक्यात 'डॅशिंग' आमदार म्हणून परिचित होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पटोले यांना उमेदवारी दिल्यामुळे वाघाये यांनी वंचितचा सिलिंडर पकडून साकोली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्याच काळात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वाघाये काँग्रेसपासून 'वंचित' झाले होते.

Bhandara-Gondia Sevak Waghaye
Bhandara BJP News : प्रतीक्षा जिल्हाध्यक्षांची; तिघांच्या नावाची चर्चा, पण ‘या’ माजी राज्यमंत्र्यांची भूमिका ठरणार महत्वाची!

या निवडणुकीत पटोले यांच्यासमोर वाघाये यांनी तगडे आव्हान उभे केले होते. राजकारणात ज्याला राजकीय हवामानाचा अचूक अंदाज येतो त्याला चाणाक्ष नेता म्हणून ओळखले जाते. अनेकांना हा अंदाज येतो, परंतु त्या आधारे मोर्चेबांधणी करता येत नाही. पण आमदार नाना पटोले हे जिल्ह्यातील राजकारणातील कदाचित एकमेव असे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांना राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येतो.

हवामानानुसार व्यवस्थित आखणी करून नाना बाजी मारण्यात यशस्वी होतात. पटोलेंच्या या 'बाजीगर'पणाचे दर्शन लाखनी तालुक्यातील जानेवारी २०२२च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत मूळचे काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांच्या घरवापसी म्हणजेच पक्षप्रवेशाने घडले. तत्पूर्वी २००९ साली साकोली विधानसभेच्या निवडणुकीत पटोले भाजपकडून तर वाघाये काँग्रेसकडून एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे ठाकले होते.

Bhandara-Gondia Sevak Waghaye
Gondia News : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या विरोधात सरसावला एक गट, नाना स्वतः घेणार क्लास !

यामध्ये पटोले (Nana Patole) यांनी वाघाये यांना धोबीपछाड देत विधानसभा गाठली होती. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पटोले यांची काँग्रेसमध्ये घरवापसी होऊन काँग्रेसने साकोली विधानसभेची ऐन वेळेवर पटोले यांना काँग्रेसची तिकीट देऊन वाघाये यांना अधांतरी ठेवले होते.

पक्षावर नाराज होऊन २०१९ची विधानसभा निवडणूक (Election) वाघाये यांनी वंचितच्या सिलिंडर या निवडणूक चिन्हावर लढवली होती. या ही निवडणुकीत वाघाये यांचा पराभव झाल्यानंतर, वाघाये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी दिल्लीवारीसुद्धा केली होती. परंतु काँग्रेस (Congress) प्रवेशासाठी त्यांना ताटकळत राहावे लागले होते.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com