Sarkarnama Impact : नाकाडोंगरीतील डान्सप्रकरणी ‘पीआय’ ‘कंट्रोल रूम अटॅच’

Strict Action : एसपींची कारवाई, विधान परिषद उपसभापतींकडूनही दखल; आयोजकाला अटक
Gobarwahi Police Bhandara.
Gobarwahi Police Bhandara.Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडईमध्ये तरुणीला पूर्ण विवस्त्र करीत नृत्य करविण्यात आल्याचं प्रकरण गोबरवाही पोलिसांना चांगलच भोवलय. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित केले होते. याप्रकरणाचा फटका पोलिस निरीक्षकांनाही (PI) बसलाय. नाकाडोंगरीतील या प्रकरणाचा ‘सरकानामा’ने सर्वांत प्रथम पर्दाफाश केला होता.

नृत्य प्रकरणातील कारवाई केवळ दोन पोलिस कर्मचाऱ्यांपुरतीच थांबलेली नाही. पोलिस अधीक्षकांनी गोबरवाही पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची (Police Inspector) तडकाफडकी बदली करीत त्यांना नियंत्रण कक्षात पाठविले आहे. ‘कंट्रोल रूम अटॅच’ नावानं ओळखली जाणारी ही बदली अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एकप्रकारची शिक्षाच पोलिस दलात मानली जाते. (Police Station Incharge Inspector Of Gobarwahi Police Station Transferred Immediately By Bhandara SP Lohit Matani in Nakadongri Case Maharashtra Vidhan Parishad Deputy Chairman Neelam Gorhe Also Took Cognition)

Gobarwahi Police Bhandara.
Bhandara : एका कार्यक्रमात सभापतीनं पैसे उधळले, दुसऱ्यात मुलीला पूर्ण विवस्त्र नाचवले

पोलिस अधीक्षक (Superintendent of Police) लोहित मतानी यांनी गोबरवाहीचे ठाणेदार नितिन मदनकर यांची उचलबांगडी केली आहे. डान्स हंगामाचा आयोजक किशोर मनीपाल गौपाले यालाही अटक करण्यात आलीय. सुरुवातीला केवळ दोन पोलिस कर्मचाऱ्यांना यासंदर्भात निलंबित करण्यात आलं होतं. राकेश सिंग सोलंखी आणि कॉस्टेबल राहुल परतेकी अशी त्यांची नावं आहेत. या पोलिसांनी नाकाडोंगरीत मंडईत बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. घटनेच्या वेळी दोघेही गैरहजर होते. दोन्ही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आलीय.

नाकाडोंगरीतील या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय. ‘सरकारनामा’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांच्याशी फोनवर विस्तृत चर्चा केली. महिलांना विवस्त्र करून नाचविण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं थातुरमातुर कारवाई करून काही होणार नाही. ठोस पावले उचला, असे आदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाकाडोंगरी प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाण्यापूर्वीच पोलिस अधीक्षक लोहित मतानी (Lohit Matani) यांनी याप्रकरणी स्वत: पुढाकार घेत कारवाईला आधीच सुरुवात केल्याचं सांगण्यात येत आहे. ठाणेदाराचीही त्यांनी बदली केल्यानं अधीक्षकांची कारवाई चर्चेत आलीय. भंडारा जिल्ह्यात अद्यापही मंडईत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. नाकाडोंगरी प्रकरणानंतर ग्रामीण भागातील इतर पोलिस अधिकारी आता चांगलेच सतर्क झाले आहेत.

नाकाडोंगरी येथे शनिवारी (ता. १८) डान्स हंगामा झाला होता. या कार्यक्रमात नागपूर येथील आर. के. डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना पूर्ण विवस्त्र करून नाचविण्यात आलं होतं. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. सुमारे पाऊण तासापर्यंत हा धिंगाणा सुरू होता.

Edited by : Prasannaa Jakate

Gobarwahi Police Bhandara.
Bhandara Sarkarnama Impact : ‘न्यूड डान्स’ प्रकरणी गोबरवाहीतील पोलिस निलंबित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com