Bhandara Collector News : नांदेडमध्ये ठेच लागली... भंडारेकर झाले शहाणे; आले ‘अलर्ट मोड’वर, जिल्हाधिकाऱ्यांचे जागरण !

Nanded : देडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तब्बल २४ रुग्ण दगावले.
Bhandara District Collector Yogesh Kunbhejkar with others
Bhandara District Collector Yogesh Kunbhejkar with othersSarkarnama
Published on
Updated on

Bhandara District Collector News : ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, अशी म्हण मराठीत आहे. दुर्लक्ष झाल्याने ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाला लागलेली ही ठोकर बघता भंडारा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर आले आहे. इतकेच काय, तर त्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर चक्क रात्र-रात्र जागरण करीत आहेत. (As many as 24 patients died in Nanded)

नांदेड येथे शासकीय रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शासकीय रुग्णालयात रात्री-अपरात्री आकस्मिक भेट देणे सुरू केले आहे. त्यामुळे सर्व प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तब्बल २४ रुग्ण दगावले. मृतांमध्ये १२ बालकांचाही समावेश होता. एका बालकासह आईचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये झाडाझडती सुरू झाली. सर्व शासकीय रुग्णालयं, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालयं, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करीत सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उशिरा रात्री भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील प्रसूती कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष, अतिदक्षता कक्ष, सामान्य रुग्णालयातील स्वयंपाक कक्ष आणि विशेष करून नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता कक्ष येथील सोयी सुविधांची पाहणी केली. रुग्णांकरिता पुरेशी औषधे आहेत का, याचाही आढावा त्यांनी घेतला.

हयगय करणाऱ्यांना फैलावर घेत रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे निर्देश दिले. पालांदूर येथे औषधीच्या तुटवड्यामुळे झालेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांची कानउघडणी केली. नऊ जानेवारी २०२१च्या रात्री एक ते दीड वाजताच्या भंडारा रुग्णालय अग्निकांड प्रकरणाने रुग्णालय प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे वाभाडे निघाले होते. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाधिकारी कुंभेजकर प्रशासनाला आधीच ‘सेफमोड’वर ठेवताना दिसताहेत.

Edited By : Atul Mehere

Bhandara District Collector Yogesh Kunbhejkar with others
Bhandara Narendra Bhondekar News : आमदार भोंडेकरांनी तोडले ‘ते’ वचन, २०२४मध्ये त्यांच्यावर ‘प्रहार’ होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com